Maharashtra SSC Exam 2024: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
Maharashtra SSC Exam 2024: दहावीच्या परीक्षा यंदाची वर्षी 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडल्या होत्या. या परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. यानंतर आता या दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक समोर आले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक समोर आले आहे.
वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार
Maharashtra SSC Supplementary exams 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षा 2024 या 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या संबंधित वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. तसेच या परीक्षेचे वेळापत्रक कसे असणार आहे? हे जाणून घेऊयात. (maharashtra ssc supplementary exams 2024 examination schedule on these date examination will start)
दहावीच्या परीक्षा यंदाची वर्षी 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडल्या होत्या. या परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. यानंतर आता या दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक समोर आले आहे. त्या वेळापत्रकानुसार या पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात, धोका देणारे सच्चे हिंदू नाहीत...', शंकराचार्यांच्या विधानाने मोठी खळबळ
दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक
16 जुलै 2024 : मराठी
20 जुलै 2024 : हिंदी
22 जुलै 2024 : इंग्रजी
23 जुलै 2024 : गणित भाग 1
24 जुलै 2024 : गणित भाग 2
25 जुलै 2024 : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
26 जुलै 2024 : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
27 जुलै 2024 : सामाजिक विज्ञान भाग 1
29 जुलै 2024 : सामाजिक विज्ञान भाग 2
यंदा दहावीत कोकणाचीच बाजी
यंदा दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला होता. त्यामुळे यावर्षी दहावीच्या निकालात १.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेली दहावीची परीक्षा दिली. त्यातील १४ लाख ८४ हजार ४४१ म्हणजेच ९५.८१ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
राज्यात कोकण विभागातील ९९.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदा नागपूर विभागाचा ९४.७३.टक्के असा सर्वात कमी निकाल लागला आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून एकूण १५ लाख ६० हजार १६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा तिसऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राचा 'खेळ'? Inside Story
त्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून ९७.२१ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ९४.५६टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी २.६५ ने अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT