Maharashtra Weather : राज्यभरात हुडहुडी, पुढील आठवडाभर थंडीची लाट, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पुढचा आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका
पुढचा आठवडाभर 'या' भागांत थंडीची लाट
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. पुढचा आठवडाभर मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे तर, त्यानंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे तापमानात वाढ होऊ शकते, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. तर अशातच राज्यात 19 नोव्हेंबर रोजी हवामानाची एकूण स्थिती कशी असेल याचा अंदाज पुढे जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा : भाजप नेत्याला नडलेल्या उज्ज्वला थिटेंचा अर्जच झाला बाद, सूनबाई होणार बिनविरोध नगराध्यक्ष?
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये तापमानात घट निर्माण होऊन कोरड्या हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तसेच याच विभागात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात थंडीचा इशारा आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तापमानात काही प्रमाणात घट निर्माण असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.










