राज्यात महिन्याच्या शेवटी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता, तर काही भागांमध्ये कोरडे हवामान, महत्त्वाची अपडेट समोर
Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार, उद्या 28 नोव्हेंबर रोजी राज्यात कोरडे आणि थंड हवामान राहील.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची लाट
भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार हवामानाची अपडेट
Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या अंदाजानुसार, उद्या 28 नोव्हेंबर रोजी राज्यात कोरडे आणि थंड हवामान राहील. उत्तर भारतातील शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे किमान तापमान सामान्यपेक्षा खाली असल्याने नागरिकांना गारव्याची झळ बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : स्मृती आणि पलाशच्या नात्यात ट्विस्ट? एक्स गर्लफ्रेंड मेरी डि'कोस्टानं केली खळबळजनक पोस्ट म्हणाली...
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदु्र्ग, मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तसेच काही तापमानात फारसा काही बदल जाणवणार नाही.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर तपामान स्थिर राहणार असल्याची शक्यता आहे. सकाळी थोडासा गारवा जाणवेल.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या एकूण जिल्ह्यांमध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच काही अंशी प्रमाणात तापमानात फरक जाणवेल.










