लग्नाला उरले होते 18 तास, नवरी हाताला मेहंदी लावून बसली होती, नंतर नवऱ्याला पत्नीविषयी आले नको तेच मेसेज...

मुंबई तक

Viral News : विवाह सोहळा सुरु होण्यास केवळ 18 तास बाकी असताना धक्कादायक घटना घडली. एका फेक आयडीवरून होणाऱ्या बायकोबाबत काहीही वाईट मेसेज येऊ लागले आणि नंतर लग्नाआधीच मोठा गोंधळ उडाला. 

ADVERTISEMENT

Viral News
Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नापूर्वी मेसेजमध्ये नवरा मुलाला धमकी

point

वधूबाबत आलेले मेसेज फेक

point

नेमकं काय घडलं? 

Viral News : सोशल मीडियावर अनेक फेक आयडी तयार करण्यात आलेल्या असतात. याच फेक आयडीमुळे अनेकदा सुशिक्षित लोकांचीही फसवणूक केली जाते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका जोडप्याचा विवाह सोहळा सुरु होण्यास केवळ 18 तास बाकी असताना धक्कादायक घटना घडली. एका फेक आयडीवरून होणाऱ्या बायकोबाबत काहीही वाईट मेसेज येऊ लागले आणि नंतर लग्नाआधीच मोठा गोंधळ उडाला. 

हे ही वाचा : मुंबईतील रेल्वे स्थानकावर तरुणाचे मुलीकडे पाहून अश्लील चाळे, तरुणीने कानाखाली काढला जाळ, VIDEO

नेमकं काय घडलं? 

नाजीशचा विवाह हा नगीना येथील रहिवासी असलेल्या रियाजुद्दीन अन्सारी नावाच्या तरुणाशी झाला होता. नाजीश देखील नगीना येथील एका गावातील रहिवाशी होती. तसेच तिचे वडील हे दिल्लीत एक व्यापारी होते. दोघांकडच्या कुटुंबियांनी लग्नासाठी वाट पाहिली होती. तेव्हा 24 नोव्हेंबर रोजी, रियाजुद्दीन लग्नाच्या मिरवणुकीसह वधूच्या घरी पोहोचला होता. तेव्हा वधूच्या कुटुंबाने आधीच हुंड्याच्या वस्तू नवऱ्याच्या घरी दिलेल्या होत्या. 

लग्नापूर्वी मेसेजमध्ये नवरा मुलाला धमकी

वधूच्या कुटुंबाने लग्नाची सर्व तयारी केली होती आणि लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत केले होते. तेव्हा त्यांनी लाखो रुपये खर्च देखील केले. त्यानंतर, लग्नाच्या काहीच तासांआधी रियाजुद्दीन अन्सारी यांना इंस्टाग्रामवर मेसेज येऊ लागले होते. संबंधित मेसेजेस हे त्यांची वधू, नाजीशाबाबत होते. मेसेजमध्ये नवरा मुलाला धमकी देण्यात आली होती की, जर तो लग्नाची मिरवणूक घेऊन वधूच्या घरी गेला तर त्याचा जीव जाईल. 

वधूबाबत आलेले मेसेज फेक

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, नवऱ्याच्या बाजूने 23 नोव्हेंबर रोजी वधूच्या घरी येऊन त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. वधूबाबत आलेले मेसेज हे फेक मेसेज आहेत. नातेसंबंध संपवण्यासाठी कोणीतरी हा प्रयत्न घेतला असल्याचं तिचं म्हणणं आहे. तेव्हा तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची अनेकदा समजूतही काढली होती. फेक आयडी तयार करणाऱ्याला पकडण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्ररित्या काम करतील, आश्वासन देण्यात आले. परंतु वराने या विवाहास नकार दिला आणि तरुणीच्या चारित्र्यावर प्रश्न केला, यामुळे वधूच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp