Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत मोठ्या पदांसाठी भरती! लाखोंच्या घरात पगार अन्... कसा कराल अर्ज?
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून सुपरवायजरी ग्रेडसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मायनिंग, ज्यूलॉजी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा एकूण 13 फील्डमधील उमेदवार भारत सरकारच्या या कंपनीच्या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारत सरकारच्या 'या' कंपनीत मोठ्या पदांसाठी भरती!
लाखोंच्या घरात मिळणार पगार...
कधीपर्यंत कराल अर्ज?
HCL Recruitment 2025: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून सुपरवायजरी ग्रेडसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मायनिंग, ज्यूलॉजी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा एकूण 13 फील्डमधील उमेदवार भारत सरकारच्या या कंपनीच्या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) च्या या भरतीसाठी 27 नोव्हेंबर म्हणजेच आज सकाळी 11 वाजता अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार www.hindustancopper.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
HCL च्या या भरतीच्या माध्यमातून जुनिअर मॅनेजर (E0 ग्रेड) च्या पोस्टवर नियुक्ती केली जाईल. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2025 पर्यंतचा कालावधी दिला असून या तारखेपर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. लेखी परीक्षा आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन अशा दोन टप्प्यांत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
काय आहे पात्रता?
या भरतीसाठी उमेदवारांची वेगवेगळी पात्रता निश्चित केली जाणार आहे. मायनिंग, ज्यूलॉजी, सर्व्हे, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल आणि सिव्हिल फील्डमध्ये जुनिअर मॅनेजर पदासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात डिप्लोमासह 5 वर्षांचा कार्याचा अनुभव असणं गरजेचं आहे. तसेच, एनव्हायरमेंट, मिनरल प्रोसेसिंग, मटेरिअल कॉन्ट्रॅक्ट या क्षेत्रांत बॅचलर डिग्री आणि 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
फायनान्स पदासाठी CA (चार्टर्ड अकाउंटंट) उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, एचआर आणि अॅडमिन म्हणून नियुक्त होण्यासाठी ग्रॅज्युएट आणि 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. पात्रतेसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात.










