भारतीय महिलेने पासपोर्ट दाखवला, चीनचे अधिकारी म्हणाले, अरुणाचल प्रदेश आमचा आहे; 18 तास अडवणूक अन्...

मुंबई तक

arunachal pradesh women shanghai airport china harrassed : भारतीय महिलेने पासपोर्ट दाखवला, चीनचे अधिकारी म्हणाले, अरुणाचल प्रदेश आमचा आहे; 18 तास अडवणूक अन्...

ADVERTISEMENT

arunachal pradesh women shanghai airport china harrassed
arunachal pradesh women shanghai airport china harrassed
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय महिलेने पासपोर्ट दाखवला, चीनचे अधिकारी म्हणाले...

point

अरुणाचल प्रदेश आमचा आहे; 18 तास अडवणूक अन्...

arunachal pradesh women shanghai airport china harrassed : मूळच्या अरुणाचल प्रदेशच्या मात्र सध्या इंग्लंडमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या प्रेमा वांगजॉम थोंगडोक यांनी चीनवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. शांघाय पुडोंग विमानतळावर (Shanghai Pudong Airport) चीनच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्या भारतीय पासपोर्टला मान्यता देण्यास नकार देत त्यांना जवळपास 18 तास अडवून ठेवून छळ केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पासपोर्ट ‘अवैध’ असल्याची घोषणा

प्रेमा 21 नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला जात होत्या. शांघाय येथे त्यांचा तीन तासांचा ट्रान्झिट स्टॉप होता. मात्र, इमिग्रेशन काउंटरवर अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट ‘अवैध’ असल्याचा ठपका ठेवत स्पष्ट सांगितले की, “अरुणाचल प्रदेश चीनचा भाग आहे.” या वक्तव्यामुळे त्या पूर्णपणे हादरल्या. याशिवाय, चीन ईस्टर्न एअरलाइन्सचे काही कर्मचारी आणि इतर अधिकारी त्यांच्यावर हसत होते, त्यांची खिल्ली उडवत होते, एवढेच नाही तर “तुम्ही मग चीनी पासपोर्टसाठी अर्ज का करत नाही?” असा प्रश्नही त्यांनी विचारल्याचा आरोप त्यांनी केला.

ट्रान्झिटच्या नावाखाली मानसिक-शारीरिक त्रास

प्रेमांच्या मते, ट्रान्झिटच्या नावाखाली हा प्रसंग तासंतास चालणाऱ्या संघर्षात बदलला. त्यांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही, पुरेसे जेवण दिले नाही, आणि विमानतळावरील मूलभूत सुविधांसाठीही प्रवेश नाकारण्यात आला. त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि वैध व्हिसा असूनही जपानसाठीची पुढील फ्लाइट पकडण्यास मनाई करण्यात आली.

ट्रान्झिट झोनमध्ये मर्यादित असल्याने त्यांना नवीन तिकीट घेण्याची, जेवण आणण्याची किंवा इतर टर्मिनलवर जाण्याची परवानगीही मिळाली नाही. याशिवाय, केवळ चाइना ईस्टर्नचीच नवीन तिकीट खरेदी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, आणि तसे केल्यावरच पासपोर्ट परत देऊ, असा सूचक इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याचा त्यांनी आरोप केला. या सर्व प्रकारामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. फ्लाइट, हॉटेल आणि इतर बुकिंग सर्व रद्द झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp