Maharashtra Weather: मुंबईत पावसाची उघडीप! 'या' जिल्ह्यांना मुसळधार इशारा; पाहा IMD अलर्ट
Maharashtra Weather Forecast Today : महाराष्ट्रातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप दिसत आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची उघडीप
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाची शक्यता
'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather Forecast Today : महाराष्ट्रातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप दिसत आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. अशात हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज (19 सप्टेंबर 2024) तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी असेल जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast today 19 September 2024 IMD alert to these districts Mumbai Pune Weather report)
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. IMD च्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी बरसण्याची अपेक्षा आहे. मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर, पुणे आणि आसपासच्या भागातही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
हेही वाचा : Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांचं सोन्यासारखं नशीब चमकेल! पण काहींच्या मागे लागणार साडेसाती
गणेशोत्सव संपताच राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे असं म्हटलं जात आहे. शनिवारपासून (21 सप्टेंबर) राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
पुढील 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे आणि रायगडसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा : One Nation One Election: आता एकाच वेळी होणार सगळ्या निवडणुका?, पण मध्येच सरकार पडलं तर..
माहितीनुसार, सध्या झारखंड आणि उत्तर छत्तीसगडच्या प्रदेशात कमी दाबाचा पत्ता निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT