Horoscope In Marathi : 'या' राशीच्या लोकांचं सोन्यासारखं नशीब चमकेल! पण काहींच्या मागे लागणार साडेसाती

मुंबई तक

ADVERTISEMENT

19 September 2024 Astrology
Today horoscope In Marathi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल

point

'या' राशीच्या लोकांचं आरोग्य उत्तम राहिल

point

'या' राशीच्या लोकांना आहे विवाहयोग

18 September 2024 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा ग्रह स्वामी असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याचं आकलन केलं जातं. 19 सप्टेंबर 2024 ला गुरुवार आहे. गुरुवारचा दिवस भगवान विष्णूला समर्पीत केला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णू देवाची उपासना केल्याने जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिष गणनेनुसार, 19 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे. तर काही राशींच्या व्यक्तींच्या जीवनात छोट्या-मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्या राशीच्या लोकांना 19 सप्टेंबर 2024 रोजी लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न होईल. पण काही गोष्टींमुळे मन अस्वस्थ होऊ शकतं. आरोग्याची काळजी घ्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वृषभ राशी

आजच्या दिवशी तुम्हाला चढ-उतार पाहायला मिळू शकतात. संध्याकाळपर्यंत परिस्थिती अनुकूल राहील. मन अशांत राहील. विनाकारण वादविवाद करू नका. नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यापारी लोकांना नफा होईल.

ADVERTISEMENT

मिथुन राशी

ADVERTISEMENT

आज काही गोष्टींबाबतीत धीर ठेवा. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. पार्टनरचं सहकार्य मिळेल. पैशांचे नवीन सोर्स तयार होतील. महत्त्वपूर्ण कामात यश मिळू शकतं.

कर्क राशी

आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कार्यालयात सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य लाभेल. आज तुम्ही शांत राहा. कुटुंबात शांती ठेवा. नोकरीत प्रगती होईल. 

सिंह राशी

धनाचं आगमन होईल, पण खर्चाचेही मार्ग खुले होतील. आर्थिक बजेट बनवून आजचा व्यवहार करा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाची साथ मिळेल.

कन्या राशी

आजचा दिवस कवी आणि लेखकांसाठी खूप चांगला राहणार आहे. कुटुंबाची साथ मिळेल. गूंतवणुकीत सकारात्मक गोष्टी घडतील. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या.

तुळा राशी

आज उद्योगधंद्यात वाढ होईल. व्यापार वाढू शकतो. आर्थिक खर्च होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. विवाहाचा योग येऊ शकतो. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळू शकते. शांत राहून काम करा.

वृश्चिक राशी

आज आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. व्यापऱ्यांना नफा होऊ शकता. शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात. आज तुम्हाला लीडरशीप कौशल्य दाखवण्याचा योग आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

धनू राशी

आज तुमच्या मनात चढ-उतार येऊ शकतात. मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्राचं सहकार्य मळू शकतं. 

मकर राशी

नोकरीत प्रगती होऊ शकते. टीम मिटींगमध्ये तुमच्या मतांचा आदर केला जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

कुंभ राशी

शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मुलांकडून एखादी गोड बातमी मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

मीन राशी 

आज तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत चांगली वेळ घालवू शकता. तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात प्रगती होईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT