Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागात हुडहुडी वाढली! वाचा IMD रिपोर्ट
Maharashtra Weather Update IMD Report Today 8 Nov 2024 : राज्यात काही ठिकाणी हवेत गारवा जाणवत असला तरी अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तुमच्या शहरात हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather Update IMD Report Today 8 Nov 2024 : राज्यात काही ठिकाणी हवेत गारवा जाणवत असला तरी अद्याप कडाक्याची थंडी पडलेली नाही. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्या कमाल आणि किमान तापमानाचा पारा कमी जास्त होत आहे. त्यामुळे दुपारी ऊन्हाचा चटका बसत आहे, तर रात्री थंडी जाणवत आहे. त्याचवेळी काही जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असल्याने हुडहुडी वाढली आहे. (maharashtra weather forecast update Today 8 november 2024 winter season minimum temperature IMD report mumbai pune)
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात हवामान विभागाचा अंदाज काय?
Temperature in Maharashtra and your city: महाराष्ट्रात नोव्हेंबर अखेरपर्यंत कडाक्याची थंडी सुरु होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कोरड्या हवामानासह निरभ्र आकाश राहील. राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं चढ-उतार होऊ शकते.
हेही वाचा : Uddhav Thackeray : गद्दारांना मोठं केलं, चूक झाली, माफ करा... ठाकरेंनी सांगितली 'वर्षा' सोडण्यापूर्वीची इनसाईड स्टोरी
कोकणात आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढत आहे, तर दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात रात्री हवेत गारवा जाणवत आहे.
हे वाचलं का?
नाशिक,पुणे प्रमाणे जळगावचे तापमान देखील कमालीचे घटले आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच या ठिकाणी पारा घसरला होता. गेल्या 24 तासांमध्ये नाशिकमध्ये राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले. या ठिकाणी 14.4 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर सांगली देखील 14.4 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा : Poonam Mahajan: 'प्रमोद महाजनांची हत्या एक षडयंत्र, पुन्हा केस उघडा', पूनम महाजनांचा मोठा गौप्यस्फोट
त्याचवेळी गेल्या 24 तासात पुण्याचे तापमान 15.2 अंश सेल्सिअस, जळगाव 15.8 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर 15.6 अंश सेल्सिअस, मालेगाव 17.8 अंश सेल्सिअस, सातारा 16.6 अंश सेल्सिअस, परभणी 18.3 अंश सेल्सिअस, नागपूर 18.6 अंश सेल्सिअस, सांगली 14.4 अंश सेल्सिअस तर अहिल्यानगरात 14.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT