Maharashtra Weather : राज्याला पाऊस झोडपणार, काही ठिकाणी यलो; तर कुठे रेड अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय. 25 जुलै रोजी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. अशातच जाणून घेऊयात 26 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
26 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावत आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय. 25 जुलै रोजी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. अशातच जाणून घेऊयात 26 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आलाय.
हे ही वाचा : कॉक्रोज जनता पार्टीच्या सरकारकडून मागण्या मान्य, लिखित पत्र अन् आंदोलन मागे
कोकण
कोकण विभागात पालघर आणि मुंबईमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे. रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक दोन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात मध्यम पावसाची शक्यता असून अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्टचा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
