Maharashtra Weather : राज्यात पाऊस घालणार धुमशान, काही जिल्ह्यांना मोठा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : 5 ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा हवामान विभागाने वर्तवलेला असून कोकण, इतर घाटमाथा परिसर आणि राज्यातील काही भागांत मान्सून जोरदार राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

point

5 ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाचे कमी अधिक प्रमाण जाणवून येते. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा हवामान विभागाने वर्तवलेला असून कोकण, इतर घाटमाथा परिसर आणि राज्यातील काही भागांत मान्सून जोरदार राहण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

हे ही वाचा : सुनेत्रा पवारांवर झालेल्या टिकेनं रान पेटलं, 'गुंगी गुडिया' टिकेचा इतिहास आला समोर

कोकण 

कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तविलेला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून यलो अलर्टचा अंदाज आहे. पालघर आणि ठाण्यात मध्यम पाऊस, तर दुसरीकडे मुंबईमध्ये देखील मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरात हलका किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा पसिरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तविण्यात आलाय.  सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवलाय. सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.