Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर, 'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी मध्यम, तर कुठे मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अशातच जाणून घेऊयात 4 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात पावसाचा जोर
'या' जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी मध्यम, तर कुठे मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण हे अधिक कमी जाणवते. याचा फटका हा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात काही प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 4 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : धाराशिव हादरलं! नळदुर्ग किल्ल्यावरून आईने तीन मुलांसह मारली उडी, माय-लेकराचा अंत
कोकण
कोकण विभागातील पालघर आणि ठाणे येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातूल धुळ्यात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्ये विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. सांगली आणि सोलापूरमध्ये विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
