Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, नवं संकट समोर

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच जाणून घेऊयात 1 सप्टेंबर 2016 रोजीचे राज्यातील एकूण हवामान अंदाज. 

ADVERTISEMENT

maharashtra weather (AI Photo)
maharashtra weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील पावसाचा वेग मंदावला

point

1 सप्टेंबर 2016 रोजीचे राज्यातील एकूण हवामान अंदाज घ्या जाणून

Maharashtra Weather : राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यातील अधिक विभागांमध्ये पावसाचा वेग मंदावला आहे. अशातच जाणून घेऊयात 1 सप्टेंबर 2016 रोजीचे राज्यातील एकूण हवामान अंदाज. 

हे ही वाचा :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो, अमित ठाकरेंनी काय केलं?

कोकण 

कोकण विभागात पालघर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. तर ठाणे आणि मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलाय.  

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात 1 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर  सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.