Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांना हवामानाचा अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे
Maharashtra Weather : राज्यात प्रामुख्याने कोरडं आणि उबदार वातावरणाचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सामान्य हवामानाची शक्यता आहे. 6 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे,
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात प्रामुख्याने कोरडं आणि उबदार वातावरणाचा अंदाज
फेब्रुवारी महिन्यात सामान्य हवामान
Maharashtra Weather : राज्यात प्रामुख्याने कोरडं आणि उबदार वातावरणाचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सामान्य हवामानाची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी आकाश निरभ्र आणि हवामान हलके राहण्याची शक्यता आहे. 6 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे,
हे ही वाचा : अजित पवारांच्या निधनापूर्वीचा शेवटचा Video आला समोर, कोणी समोर आणला तो व्हिडिओ?
कोकण :
कोकण विभागात मुंबईमध्ये सकाळी हलक्या स्वरुपात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसेच समुद्रकिनारी हलक्या स्वरुपात हवेची आद्रता जाणवेल, यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर या भागांत सकाळी-सायंकाळी थंडीचा अनुभव येईल, दुपारी उन्हाचा चटका कायम राहण्याची जाणवेल. कोरड्या वाऱ्यामुळे धुळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड या मराठवाडा जिल्ह्यांत थंडी कमी होऊन उष्णता वाढण्यास सुरुवात झाली.










