Maharashtra weather : राज्यात पुढील काही तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार
Maharashtra Weather : उन्हाळा ऋतु असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशातच काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे, जाणून घेऊयात 6 एप्रिल 2026 रोजी एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात हवामानात सातत्याने बदल
कुठे ऊन तर कुठे अवकाळी पाऊस
Maharashtra Weather : राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. सध्या उन्हाळा ऋतु असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अशातच काही जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील इतर काही भागांमध्ये कोणाताही अलर्ट जारी केला नाही, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जाणून घेऊयात 6 एप्रिल 2026 रोजी एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : पुण्यात दुर्दैवी अपघात: बास्केटबॉलचा हुप विद्यार्थ्याच्या डोक्यात कोसळल्याने तरुणाचा करुण अंत, कॅम्पसमध्ये संतापाची लाट
कोकण
कोकण विभागात हवामान कोरडं राहिल अशी शक्यता आहे. किनारी भागात प्रामुख्याने आर्द्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र, या विभागाला अवकाळी पावसाचं सावट नाही.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश विबागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट असल्याची शक्यता जारी करण्यात आली आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. यामुळे हवामानात अचानकपणे बदल होण्याची शक्यता आहे.









