मुंबई-पुणे प्रवास सुसाट, महामार्ग आता 10 पदरी होणार, महत्त्वाची अपडेट
Pune News : मुंबई-पुणे या दोन शहरादरम्यानचा प्रवास आता अधिक वेगाने होणार आहे. यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने मोठा निर्णय घेत कंबर कसली आहे. महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्गाच्या 10 पदरीकरण करण्यासाठी महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट
'मिसिंग लिंक' प्रकल्प महिन्यात वाहतुकीसाठी खुला
पुण्याची गोष्ट : मुंबई-पुणे या दोन शहरादरम्यानचा प्रवास आता अधिक वेगाने होणार आहे. यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने मोठा निर्णय घेत कंबर कसली आहे. महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्गाच्या 10 पदरीकरण करण्यासाठी महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पावसाळ्यात सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहिती MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी सांगितलं.
हे ही वाचा : पुण्यातील फुरसुंगीत तरुण सराफ व्यवसायिकाने प्रेमसंबंधातून उचललं टोकाचे पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय?
मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट
हा प्रकल्प साधारणपणे 2029-30 या कालावाधीपर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. महामार्गाचे 10 पदरीकरणामुळे मुंबई-पुणे या शहराचे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. तसेच वारंवार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याचा मोठा फायदा होण्याची अधिक शक्यता आहे. विशेष म्हणजे, रस्त्याचे काम सुरु असताना, वाहतुकीला कोणतीही समस्या होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने कामाचे नियोजन करण्यात आले.
या भल्या मोठ्या प्रकल्पासाठी लागणारा एकूण निधी वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोलवसुलीच्या मदतीत 15 वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
हे ही वाचा : आई अन् मुलाने मिळून पोटच्या मुलीला विकले, नंतर तिचे जबरदस्ती लग्न लावले... नात्याला काळिमा फासणारी घटना
'मिसिंग लिंक' प्रकल्प महिन्यात वाहतुकीसाठी खुला
तसेच महामार्गाचा 13 किमी अंतर असलेला महत्त्वाचा 'मिसिंग लिंक' हा प्रकल्प मे महिन्यात वाहतुकीसाठी खुला कारण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे घाटातील अंतर कमी करण्यासाठी होणार असून प्रवाशांना मोठा सुटकेचा निश्वास मिळेल. लोणावळा-खंडाळा घाट परिसरातील वळणदार रस्त्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे.









