Maharashtra Weather: आज राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट
Maharashtra Weather News : यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे.
अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
Maharashtra Weather News : यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अदांज हवामान विभागाने वर्तवविला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज (8 सप्टेंबर 2024) पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे(maharashtra Weather update today 8 september 2024 IMD alert mumbai weather report)
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्यतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास असेल.
राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. तर अनेक भागात पावसाची उघडीप आहे. राज्यातील काही भागात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर काही भागात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.
तसेच मराठवाड्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. कोकणातही सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काढणीस तयार असलेल्या मुग तसेच उडीद पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी आणि काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT