Manoj jarange : 'सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी', अंतरवाली सराटीत प्रचंड गोंधळ
Manoj Jarange Criticize Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीस आंतरवाली सराटीतून चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांनी बैठकीतून थेट सांगर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला आहे. बैठकीतून इशारा देताना जरांगे पाटील ताडकन उठले आणि तत्काळ जाण्याची तयारी केली.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Criticize Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीस अंतरवाली सराटीतून चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटलांनी बैठकीतून थेट सांगर बंगल्यावर जाण्याचा इशारा दिला आहे. बैठकीतून इशारा देताना जरांगे पाटील (Manoj Jarange) ताडकन उठले आणि तत्काळ जाण्याची तयारी केली. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करण्याचा आणि अडवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे आंतरावली सराटीत गोंधळ उडाला होता. (manoj jarange patil angry on devendra fadnavis maratha reservation sagar bunglow ajay bawaskar maharaj cm eknath shinde)
ADVERTISEMENT
अंतरावली सराटीतील बैठकीत बोलताना जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. 'तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी. मी इथे उपोषण करून मरण्यापेक्षा मी तुझ्या सागर बंगल्यावर पायी येतो. मी मध्ये अन्नही घेणार नाही, मी मध्ये जर मेलो, तर मला मेलेला म्हणून मला माघारी आणा, नाहीतर सगेसोयऱ्यांचा गुलाल घेऊन येतो,अशी भूमिका जरांगेंनी घेऊन ते स्टेजवरून उठले होते.
हे ही वाचा : 'BJP चं धोरण मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि...' वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात
जरांगेंनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना शांत करायचा प्रयत्न केला होता.मात्र जरांगे काय शात बसले नाही.त्यानंतर अंतरवालीच एकच गोंधळ उडाला होता. यानंतर जरांगे पायी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्याच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत. या सर्व घडामोडीमुळे आंदोलन स्थळी मोठा गोंधळ उडाला होता.
हे वाचलं का?
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
हे सगळं करतोय ते फक्त देवेंद्र फडणवीस. मराठ्यांचा दरारा पुन्हा निर्माण झाला आहे आणि हा दरारा संपवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हाताने संपवायचं. यात एकनाथ शिंदेंचेही दोन-चार लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केला आहे.
हे ही वाचा : ''वंचित'महाविकास आघाडीचाच एक घटक', राऊतांनी स्पष्टच सांगितलं...
सगेसोयरेचं होऊ देत नाहीत आणि 10 टक्के मराठ्यांवर लादायचं काहीही करू आणि हे पोरग (मनोज जरांगे) होऊ देत नाही. हे पोरग इथेच संपलं पाहिजे नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. नसता याला बदनाम तरी करावं लागेल किंवा उपोषणात मरू द्यावं लागेल. सलाईनमधून विष देऊन तरी... म्हणून मी परवा रात्री सलाईन बंद केलं. याचं एन्काऊंटर तरी करावं लागेल हे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे, असा गंभीर आरोप देखील जरांगे पाटलांनी यावेळी केला.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसला एवढीच खुमखुमी आहे ना, तर बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखव. तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी, पण समाजासोबतची ईमानदारी मी नाही विकू शकत, असे जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT