'BJP चं धोरण मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि...' वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vijay Wadettiwar Chandrashekhar Bawankule
Vijay Wadettiwar Chandrashekhar Bawankule
social share
google news

Vijay Wadettiwar : आगामी काळातील लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. त्यासाठी भाजपकडून वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये (BJP) येत आहेत. त्यामुळे आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले होते. त्यावरून आता त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदरा हल्लाबोल केला जात आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या आवाहनानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बावनकुळे यांनी आवाहन केल्याप्रमाणेच भाजपचे धोरण आहे.

खून करा आणि संपवा

 'मैत्री करा, मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि खून करा आणि संपवा असं भाजपचं पूर्वीपासूनचं धोरण असल्याचा जोरदार हल्लाबोल केला आहे. जे बावनकुळे बोलले आहेत, ते खरं बोलले आहेत आणि ते खरं बोलणारे नेते असल्यामुळे ते त्यांच्या मुखातून सत्य बाहेर पडलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील वाघ नखांवरही त्यांनी टीका टीप्पणी केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाठीत खंजीर खुपसा

विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी  'मैत्री करा, मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा, खून करा आणि संपवा अशी गंभीर टीका त्यांनी भारतीय जनता पार्टीवर केली आहे. यावेळी त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्यावरून जोरदार हल्लाबोल केला. 

पक्ष संपवा

ही भाजपची पूर्वीपासूनच नीती असल्याचाही आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी पक्ष संपवण्याच्या वक्तव्यावरून जोरदार राजकारण तापले असून भाजपबरोबरच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 'वंचितला आम्ही 'त्या' जागा द्यायला तयार',राऊतांनी 'मविआ'ची भूमिका सांगितली

    follow whatsapp

    ADVERTISEMENT