Manoj Jarange : 'तू असाच टपकणार आहेस', जरांगेंचा भुजबळांवर 'वार'

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

'याला टपकवीन, त्याला टपकवीन.. मला स्वत:ला धमकी' दिल्याचा आरोप भुजबळांनी जरांगेंवर (Manoj Jarange Patil) केला होता. या आरोपावर आता जरांगेनी 'तू असाच टपकरणार आहेस' असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation cm eknath shinde
social share
google news

Manoj Jarange Patil Criticize Chhagan Bhujbal on Maratha Reservation : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विशेष अधिवेशनात बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला चढवला होता. 'याला टपकवीन, त्याला टपकवीन.. मला स्वत:ला धमकी' दिल्याचा आरोप भुजबळांनी जरांगेंवर (Manoj Jarange Patil) केला होता. या आरोपावर आता जरांगेनी 'तू असाच टपकरणार आहेस' असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation cm eknath shinde)  

अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांची बैठक सूरू आहे. या बैठकीतून बोलताना जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. 'त्याने (भुजबळात) सभागृहात बेल दाबून का धरली? हे पण मला माहिती आहे.कारण तुला कुणीच बोलून देणार नव्हतं, म्हणून तू बेल दाबून धरली होती', असा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला. तसेच घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता हे मला चांगलचं माहिती आहे, असा आरोप देखील जरांगेंनी भुजबळांवर केला. 

हे ही वाचा : कोण आहेत अनिल मसिह?, एकच वाद नाही तर...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'विधानसभेत ओबीसीचा एखादा प्रश्न मांडायचा का नाही. नेता आहे तो.  मांडतो काय, तो मला टपकवेल त्याला अटक करा...च्या***** बधीर... इतकी मोठी संधी होती ओबीसींचा प्रश्न मांडायचा, पण तो नाही मांडला, मला मारेन, टपकवेन म्हणतोय..मला काय दुखतंय मारायला, तू असाच टपकणार आहेस' अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली.  

जरांगे पुढे म्हणाले, 'डोकं खाजवून खाजवून तुझी सालपट निघाली, तरी तुला मेळ नाही लागायचा मी काय चीज आहे,  उगचं बोलला तो? काय गरज होती त्याला माझ्याविरोधात बोलायची, त्याला कोण मारील काय? आणि सांगतो विधानसभेच्या पटलावर... विधानसभेच्या पटलावर इतका विषय सांगतात का? समजून तरी घेत जा रे काय म्हणतोय ते.. टपकवीन म्हटल्यावर टपकवीन सांगत असतो का मी...याला काय करावं....एकदा आरक्षण मिळू द्या, मग तुला दाखवतो, असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला आहे. 

ADVERTISEMENT

छगन भुजबळ काय म्हणाले होते? 

'छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना.. आणि आम्हाल तर नेहमीच देतात.. अहो आईवरून शिव्या..' असं म्हणत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Sharad Pawar : 'ही एकप्रकारे धमकी', अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर पवार काय म्हणाले?

आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला. त्याबद्दल मला विरोध करायचा नाही. किंबहुना आम्ही सांगतच होतो की, वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या.. पण ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला ते सतत धमक्या देतात. याला टपकवीन, त्याला टपकवीन.. मला स्वत:ला धमकी.' 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT