Sharad Pawar : 'ही एकप्रकारे धमकी', अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर पवार काय म्हणाले?

ADVERTISEMENT

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar Reaction on Ashok chavan
social share
google news

Sharad Pawar Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्षांतरावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर शऱद पवार म्हणाले, "अशोक चव्हाणांचं उदाहरण आमच्या सगळ्यांना आश्चर्यकारक होते. पण, मला तितके आश्चर्यकारक वाटत नाही. कारण, भाजपनं एक व्हाईट पेपर काढला होता. त्यात आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख होता. त्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की ही एकप्रकारे धमकी असण्याची शक्यता आहे. या धमकीचे परिणाम नंतर झाले," असे मत शरद पवारांनी मांडले.

इंडिया आघाडीबद्दल पवार म्हणाले...

इंडिया आघाडीतील अनेक पक्ष बाहेर पडताना दिसत आहे. पवार म्हणाले, "इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद आहेत. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस. मात्र ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही", असे पवार यांनी सांगितले. 

"काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे", असेही पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT