Maratha Reservation March : मुंबईकरांना मनोज जरांगे यांची विनंती, म्हणाले…
मुंबईत आपल्याला प्रचंड मैदाने लागणार आहेत. पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी आम्हाला मुंबईच्या मराठा समाजाची आवश्यकता आहे. त्यांनी या व्यवस्था कराव्यात. तसेच मुंबईतल्या सगळ्या जाती धर्माने सहकार्य करावे, अशी विनंती देखील जरांगे पाटलांनी केली.
ADVERTISEMENT
Maratha Reservation March : इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी काढणार आहेत.या दिंडीची सांगता मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे.मराठ्यांचे हे आंदोलन आता मुंबईत होणार असल्याने जरांगे पाटलांनी मुंबईकरांना मोठं आवाहन केले आहे.मुंबईत आपल्याला प्रचंड मैदाने लागणार आहेत. पाण्याचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे.त्यासाठी आम्हाला मुंबईच्या मराठा समाजाने आवश्यक तितकी मदत करावी,असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.मुंबईतल्या सगळ्या जाती धर्माने सहकार्य करावे,अशी मुंबईतील जनतेला विनंती असल्याचे ही जरांगेंनी म्हटले आहे. (manoj jarange patil request to mumbaikars on antarwali sarati to mumbai rally azad maidan protest maratha reservation)
मनोज जरांगे पाटलांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अंतरावली सराटीतून निघणारी ही पायीदिंडी कोणकोणत्या मार्गाने मुंबई दाखल होणार आहे, याची सुरुवातीला त्यांनी माहिती दिली. यासोबत मनोज जरांगेनी मुंबईकरांना आणि तेथील मराठा समाजाला देखील आवाहन केले आहे.कुणी गट तट ठेवू नका. कारण आमच्या जिथपर्यंत ओळखी आहेत, तिथपर्यंत आम्ही सांगितलंय, पण ज्यांच्या ओळखी नाहीत त्यांनी असे समजू नका आम्हाला सांगितले नाही, आम्हाला फोन आले नाहीत. यावेळेस मराठा आणि आपलेच भाऊ म्हणून लढा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ही विनंती यासाठीच आहे,कारणअशी संधी पुन्हा येणार नाही. तुम्हाला नसेल विचारले असेल तर स्वत:हून पुढे या.सगळ्या मराठा समाजाने मतभेद सोडून एकत्र यावे, अशी विनंती मनोज जरांगेनी मुंबईकरांना आणि मराठा समाजाला केली आहे.
हे ही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?
दरम्यान मुंबईत आपल्याला प्रचंड मैदाने लागणार आहेत. पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी आम्हाला मुंबईच्या मराठा समाजाची आवश्यकता आहे. त्यांनी या व्यवस्था कराव्यात. तसेच मुंबईतल्या सगळ्या जाती धर्माने सहकार्य करावे, अशी विनंती देखील जरांगे पाटलांनी केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
“आपण असताना जर आपल्या पोरांना आरक्षण मिळालं नाही, तर त्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. हमाली करण्यापलीकडे हाल होतील. घरी राहू नका. आपली ही शेटची लढाई आहे. आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. पाण्याची व्यवस्था, धान्य कसं घ्यायचं आहे. दोन दिवस-दोन रात्री बसून हे नियोजन तयार केलं आहे”, अशी माहिती जरांगे यांनी दिली.
हे ही वाचा : अजितदादांचे पदाधिकारी ऐटीत फिरणार, 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ दिल्या गिफ्ट
जरांगे पुढे म्हणाले की, यासाठी आचारसंहिता पाळायची आहे. सगळ्यांनी नियमाचं पालन करावं. फोटो काढण्यासाठी गर्दी करू नका. ज्या तुकडीत ठरलं आहे, त्या तुकडीसोबत राहायचं आहे. तुकड्या बदलू नका. जो मार्ग आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. आता घरी थांबू नका. मराठा समाज मुंग्यांसारखा बाहेर पडला पाहिजे. मुंबईपर्यंत मी शंभर टक्के जाणार आहे. मी लढायला लागलो आहे आणि तुमच्या पाठबळाची गरज आहे. मी मागे हटणार नाही. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की, आता घरी थांबू नका”, असे आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केली.
ADVERTISEMENT
अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी कशी मार्गस्थ होणार आहे, याची माहिती देखील त्यांनी दिली.आंतरवालीवरून 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दिंडी निघेल. अंतरवालीनंतर शहागड, गेवराई, पाडळशी, मांदळमोरी, तांदळा-मातुरी-खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे जाऊन आझाद मैदान आणि दादरमधील शिवाजी पार्कवर दाखल होणार आहे. या दिंडी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT