Mansoon update : 12 दिवसांआधीच राज्यात मान्सून दाखल, मुंबई-पुण्यात काही तासांतच धडकणार
Mansoon update : राज्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी (25) मे रोजी मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे

रविवारी (25) मे रोजी मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Mansoon update : राज्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. रविवारी (25) मे रोजी मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 24 मे रोजी मान्सून गोवा येथे दाखल झाला होता. यानंतर कोकणात येण्यासाठी मान्सूनला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो, असा अंदाज आहे. सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने राज्यात मान्सून दाखल होणार आहे.
हेही वाचा : फलटणमधील धुमाळवाडीत पावसाचा हाहाकार, पूल वाहून गेला, रस्ताही पाण्यात, 35 गावांचा संपर्क तुटला
दरवर्षीच्या तुलनेत राज्यात मान्सूनने 10 ते 12 दिवसांआधीच हजेरी लावली आहे. आतापर्यंतच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून हा 5-7 जूनपर्यंत दाखल व्हायचा. मात्र, यंदा मान्सूनने राज्यात लवकरच दमदार एंट्री केली आहे. मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी X ट्विटवर माहिती दिली आहे.
होसाळीकर यांचं ट्विट जसंच्या तसं
आज २५ मे रोजी दक्षिण कोकणात मान्सून दाखल,राज्यात आगमनाच्या जवळपास १० दिवस आधीच.(५ जून सामान्य तारीख). राज्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे व निश्चितच मान्सून संबंधित कामांना गती मिळेल.राज्यात मान्सूनच्या पुढील आगमनासाठी अनुकूल परिस्थिती.
राज्यात मान्सून आगमन २०११ ते २०२५ आलेख खाली.
पुणे-मुंबईत मान्सून लवकरच धडकणार
दरम्यान, राज्यातील तळकोकणात मान्सून दाखल झाला असून पुणे-मुंबईमध्ये लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मुंबईत मध्यरात्री ते पहाटेपर्यंत हलक्या सरी जाणवत होत्या. तर पालघरमध्ये पहाटेपासून पावसाने दमदार बॅटिंग केली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र हादरला! कोल्ड ड्रिंक्समध्ये औषध टाकलं, दारू पाजली..नराधमांनी MBBS विद्यार्थीनीसोबत केला गँगरेप
मान्सूनचे आगमन झाल्याने शेकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी हे खरीप पिक घेत असतात. यामुळे त्यांना खरीप पिक पिकवण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावं लागतं. मान्सून लवकर आल्याने हा मान्सून दरवर्षीच्या तुलनेत लवकर तर जाणार नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.