Maratha Reservation : ‘त्यांचं नाव तोंडातून काढू नका’, सुनील कावळेंच्या सुसाईड नोटमध्ये काय?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation : what is in the sunil kawale suicide note?
Maratha Reservation : what is in the sunil kawale suicide note?
social share
google news

Maratha reservation Sunil Kawale suicide note : ‘मला वाटलं… मी केलं… मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो. सर्वांनी मला माफ करावं’, असं म्हणत सुनील कावळे या मराठा आरक्षण आंदोलकाने मुंबईत गळफास घेतला. मुंबईतील वाद्रे पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलाला लटकून घेत सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. (Maratha Reservation Supporter Sunil Kawale Suicide Note)

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षण मागणीने राज्यात जोर धरला. मनोज जरांगे पाटील राज्यभर फिरताहेत. त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला आहे. जरांगे मुंबईत असतानाच जालना जिल्ह्यातील एका मराठा आंदोलक समर्थक कार्यकर्त्याने आत्महत्या केली.

सुनील कावळे यांनी सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय? वाचा सुसाईड नोट जशीच्या तशी

महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी सुनील बाबूराव कावळे,
मु. पो. चिकणगाव,
तालुका अंबड, जिल्हा जालना

एकच मिशन, मराठा आरक्षण. एक मराठा लाख मराठा… साहेब, आता कोण्या नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर 24 हा मराठा आरक्षण दिवस. या मुंबईमध्येच… आता माघार नाही. कोणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचं नाव तोंडातून काढू नका.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Manoj Jarange Patil शिंदे सरकारवर कडाडले! म्हणाले, “आमचे आणखी किती मुडदे पाडायचेत”

आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये या, उपोषणाला बसू. ऊठ मराठा जागा हो… पण लक्षात ठेवा, शांततेत यायचंय… हा शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मराठा शेतकरी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. सण-वार काय येत राहतील. पण, आता एकच मिशन मराठा आरक्षण… संत, महंत आणि कीर्तनकारांनी कीर्तनातून मराठा आरक्षण समजावलं.

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?

आपण चार पाच दिवस उपोषण केलं, तर कुणी मरत नाही… कोरोनाचं संकट आलंच होतं ना? दोन महिने घरात बसलोच होते ना? काय झालं? चारपाच दिवस शाळेत गेलं नाही, तरीही काहीही फरक पडत नाही. लढा गरजवंतांचा, लढा निष्ठावंतांचा लढा शौर्यवंतांचा… बहुसंख्य असूनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या मराठ्यांचं आता एकच मिशन, आधी मराठा आरक्षण मगच इलेक्शन. मला वाटलं… मी केलं… मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो. सर्वांनी मला माफ करावं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

जाणून घ्या सुनील कावळे यांच्याबद्दल

सुनील बाबूराव कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यात असलेल्या अंबड तालुक्यातील चिकनगावचे रहिवाशी होते. त्यांची घरची स्थिती हलाखीची आहे. १० ते १५ वर्षांपूर्वी ते छत्रपती संभाजीनगरला स्थायिक झाले. ते ड्रायव्हर म्हणून काम करायचे. जुन्या मालकाच्या गाडीवर कामाला जातो, असं ते घरी सांगून गेले होते. पण, त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT