डॉली चायवाल्याचं आता काय खरं नाय! मार्केटमध्ये उतरली 'मॉडेल चायवाली', VIDEO तुफान व्हायरल

मुंबई तक

Model Chaiwali Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून डॉली चायवाला आणि वडापाव गर्लने धुमाकूळ घातला आहे. डॉली चायवाल्याने बिल गेट्स यांना चहा दिल्याची इंटरनेटवर तुफान चर्चा आहे.

ADVERTISEMENT

Model Chaiwali vs Dolly Chaiwala
Model Chaiwali Video Viral On Instagram
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मॉडेल चायवालीचा व्हिडीओ का होतोय व्हायरल?

point

डॉली चायवाल्याला टक्कर दिल्यानंतर मॉडेल चायवाली आली चर्चेत

point

मॉडेल चायवालीच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

Model Chaiwali Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून डॉली चायवाला आणि वडापाव गर्लने धुमाकूळ घातला आहे. डॉली चायवाल्याने बिल गेट्स यांना चहा दिल्याची इंटरनेटवर तुफान चर्चा आहे. तर वडापाव गर्ल तिच्या हटके अंदाजामुळे बिग बॉस ओटीटीपर्यंत पोहोचली होती. दिवसेंदिवस दोघांचीही लोकप्रियता वाढत आहे. पण आता टक्कर द्यायला मॉडेल चायवाली मार्केटमध्ये उतरली आहे. लखनऊमध्ये चहाची टपरी लावणारी स्टयलिश मॉडेल चायवालीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप पसंत आला असून काहींनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.(Dolly Chaiwala and Vadapav Girl have been making waves on social media for the past few days. Model chaiwali also came in limelight)

मॉडेल चायवालीचा व्हिडीओ का होतोय व्हायरल?

चहाच्या टपरीसोबत फॅशनेबल लुकमुळेही मॉडेल चायवाली खूप चर्चेत आली आहे. व्हिडीओत पाहू शकता की, चहाच्या टपरीवर मॉडेल चायवाली कशापद्धतीने भन्नाट पोज देत ग्राहकांशी चर्चा करते. तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मक उर्जा अन्य चहावाल्यांपेक्षा खास असल्याचं पाहायला मिळत आहे. लखनऊमध्ये हा नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे. 

हे ही वाचा >> हे ही वाचा >> Garba Shocking Video: अरे बापरे... गरबा खेळता-खेळता आला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय?

मॉडेल चायवालीच्या टपरीवर फक्त स्थानिक लोक भेट देत नाहीत, तर नेटकरीही या टपरीवर आवर्जून भेट देत आहेत. ज्या लोकांनी चायवालीचा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांना चहाचा स्वाद आवडलाच आहे, पण हे लोक चायवालीच्या स्टाईलवर कौतुकाचा वर्षावही करत आहेत. काही नेटकऱ्यांनी लिहिलं, ही चहावाली कमाल आहे. तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, तिचा स्टाईल खूप कूल आहे.

इथे पाहा व्हिडीओ

@thehungrypanjabi नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाख 42 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये चहाच्या टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे. या व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलं, केसांच्या सर्व ड्रँडरफला चहात मिसळून टाक. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, चहाचा स्वाद 2 % आणि ओव्हरअॅक्टिंग 98 %, अशा मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडीओला देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट

हे वाचलं का?

    follow whatsapp