Mukesh Ambani : धमकीचे 5 ईमेल, 400 कोटींची खंडणी; अंबानी धमकी प्रकरणात 19 वर्षीय तरूणाचा हात

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mukesh ambani death threat 19 year old youth from telengana arrested
mukesh ambani death threat 19 year old youth from telengana arrested
social share
google news

Mukesh Ambani Death Threat Accuse Arrested : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तेलंगणात (Telangana) जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. गणेश रमेश वनपारधी असे या अटक झालेल्या 19 वर्षीय आरोपीचे नाव आहे. या आरोपीने मुकेश अंबानी यांना तीन धमक्याचे ई मेल पाठवले होते.या धमक्यांमध्ये त्याने 20 करोड, 200 करोड आणि 400 करोडची खंडणी मागितली होती. आता त्याला अटक करण्यत आली असून पुढील तपास सूरू आहे.(mukesh ambani death threat 19 year old youth from telengana arrested)

पोलिसांनी तपासाच्या सुरुवातीला आरोपीने पाठवलेल्या ईमेलचा वीपीएन नेटवर्कचा शोध लावला होता. यावेळी नेटवर्क बेल्जिअमचे दाखवले होते. त्यानंतर -पोलिसांनी कसून तपास केला, या सर्व प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकात आढळले. आरोपी वनपारधीने शादाब खानच्या नावाने धमकीचे ई-मेल पाठवले होते. आरोपीने पहिल्या ईमेलमध्ये 20 कोटी रुपयांची मागणी केली होती, नंतर मागणी वाढवत 400 कोटींवर नेली आणि असे सुमारे पाच ते सहा ईमेल पाठवले, असा आरोप आहे. यापूर्वी, बेल्जियममध्ये ईमेल पाठवण्यासाठी वापरले जाणारे व्हीपीएन नेटवर्क आढळले होते.

हे ही वाचा : Crime : लव्ह, सेक्स आणि धोका! ब्रेकअपनंतर अश्लील व्हिडीओ बनवून..,तरूणीसोबत काय घडलं?

धमकीचे मेल

धमकी देणाऱ्या व्यक्तीने 27 ऑक्टोबर रोजी पहिला मेल पाठवला होता. मुकेश अंबानींच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर पाठवलेल्या ईमेलमध्ये ‘तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहे’, असे लिहिले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना 29 ऑक्टोबरला दुसरा धमकीचा ई-मेल आला होता. ईमेल करणार्‍याने म्हटले आहे की, अद्याप आमच्या ईमेलला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाहीये. त्यामुळे आता 200 कोटी रुपये द्यावे लागतील. जर असे केले नाही तर लक्षात ठेवा की डेथ वॉरंटवर आधीच स्वाक्षरी झाली आहे. ज्या ईमेलमधून धमकी देण्यात आली आहे, त्यात म्हटलं आहे की, “U have not responded to our email. Now the amount is 200 crore, otherwise the death warrant is signed.(तुम्ही आमच्या ईमेलला उत्तर दिलं नाहीये. आता 200 कोटी रुपये द्या, अन्यथा डेथ वॉरंटवर स्वाक्षरी झालीच आहे”.

सोमवारी 30 ऑक्टोबरला अंबानी यांना यांना धमकीचा तिसरा मेल आला होता. या धमकीच्या मेलमध्ये लिहलंय की, आता रक्कम 400 कोटी रुपये झाल्याचे या मेलमध्ये म्हटलंय. यासोबतच ‘तुमची सुरक्षा कितीही कडक असली तरी आमचा एक शुटर तुम्हाला पुरेसा’ असल्याचे अज्ञात आरोपीने म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक धमकीनंतर आरोपी पैशाटची रक्कम वाढवत आहे..

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Elvish Yadav: रेव्ह पार्टीमध्ये का नेतात नाग, विषारी साप अन् नशा.. काय आहे कनेक्शन?

आरोपीला तेलंगणातून अटक

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव शादाब खान आहे आणि दुसरे म्हणजे हे मेल युरोपियन देश बेल्जियममधून पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र ही ओळख खरी की खोटी हे अद्याप समजू शकले नाही. याचा खुलासाही पोलिसांनी शनिवारी केला आहे. तपासात तेलंगणातील एका १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव गणेश रमेश वनपारधी आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT