22 मजले, Sea View… मुकेश अंबानींनी कोणाला गिफ्ट केलं 1500 कोटींचं घरं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mukesh Ambani has gifted his oldest employee Manoj Modi a house worth Rs 1,500 crore
Mukesh Ambani has gifted his oldest employee Manoj Modi a house worth Rs 1,500 crore
social share
google news

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला दिलेल्या एका गिफ्ट सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अंबनी यांनी त्यांचे सर्वात जुने कर्मचारी मनोज मोदी यांना तब्बल 1 हजार 500 कोटी रुपयांचे घर भेट म्हणून दिले आहे. एवढे महागडे गिफ्ट एखाद्या कर्मचाऱ्याला देण्याची भारतातली ही पहिलीच वेळ असल्याच सांगितलं जात आहे. (Mukesh Ambani has gifted his oldest employee Manoj Modi a house worth Rs 1,500 crore)

मनोज मोदी नेमके आहेत तरी कोण?

मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे उजवा हात मानले जातात. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रत्येक डीलमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जाते. मनोज मोदी 1980 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजशी जोडले गेले आणि तेव्हापासून ते कंपनीसोबत आहेत. रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये संचालकपदाची जबाबदारी सांभाळणारे मनोज मोदी लाइमलाइटपासून कायम दूर राहतात.

मनोज मोदींना भेट दिलेल्या घराची खासियत काय आहे?

फर्निचर इटलीहून आयात केले

अंबानी कुटुंबाने मनोज मोदींसाठी मुंबईतील नेपियन सी रोड या पॉश भागात 22 मजली इमारत खरेदी केली आहे. या घराचे नाव ‘वृंदावन’ असे आहे. 22 मजल्यांची ही इमारत 1.7 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरली आहे. मॅजिकब्रिक्स डॉट कॉमच्या मते, या इमारतीची किंमत सुमारे 1 हजार 500 कोटींच्या घरात आहे. एका अहवालानुसार, तलाटी अँड पार्टनर्स एलएलपी हे घराचे डिझायनर आहेत. तर घरातील काही फर्निचर इटलीमधून आयात करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तीन बाजूंनी समुद्राचे दृश्य :

या 22 मजली इमारतीत पहिले सात मजले कार पार्किंगसाठी राखीव आहेत. मनोज मोदींच्या इमारतीचा प्रत्येक मजला 8,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. नेपियन सी रोड हा दक्षिण मुंबईतील मलबार हिलजवळील एक मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे. हा परिसर हिरव्यागार जागांसाठी ओळखला जातो. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेल्या या ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. मनोज मोदींचे हे घरही तीन बाजूंनी समुद्राभिमुख आहे.

ADVERTISEMENT

मुकेश अंबानी आणि मनोज मोदी यांनी एकत्र शिक्षण घेतलं :

मनोज मोदी आणि मुकेश अंबानी हे बॅचमेट आहेत. दोघांनी मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी कंपनीचे प्रमुख असताना मनोज मोदी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला रिलायन्समध्ये आले. मनोज मोदी हे मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे मागील पाच दशकांपासूनचे मित्र आहेत. मनोज मोदी आता मुकेश अंबानी यांची मुले आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यासोबत काम करत आहेत.

ADVERTISEMENT

antilia

जगातील सर्वात महागड्या घरात अंबानी राहतात :

मनोज मोदींना 1 हजार 500 कोटी रुपयांचे घर भेट देणारे मुकेश अंबानी स्वतः देखील जगातील सर्वात महागड्या घरात राहतात. ‘अँटिलिया’हे त्यांचे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे. अटलांटिक महासागरातील एका पौराणिक बेटावरून याला ‘अँटिलिया’ असे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंबईस्थित अँटिलिया 27 मजली असून हे तब्बल 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. विशेष म्हणजे घराच्या प्रत्येक खोलीचे आतील भाग इतरांपेक्षा वेगळे दिसते. अँटिलियाची रचना शिकागोस्थित वास्तुविशारद ‘पर्किन्स’ यांनी केली आहे. तर ‘लॅग्टन होल्डिंग’ या ऑस्ट्रेलियन बांधकाम कंपनी बांधकाम केले आहे.

स्वप्नातील घराला 7 वर्ष पूर्ण:

मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या मुकेश अंबानींच्या स्वप्नातील घराला 7 वर्ष पूर्ण झाली. मुकेश अंबानी हे पत्नी नीता अंबनी, मुले आणि आईसोबत वरच्या मजल्यावर राहतात. 8 रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचे धक्के सहन करण्याची आणि पचवण्याची ताकद अँटिलियामध्ये आहे. एका रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांचे घर 200 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT