Mukesh Ambani म्हणाले, ‘Reliance गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील!’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mukesh ambani showcased his gujarati roots said reliance was is and will remain a gujarati company
mukesh ambani showcased his gujarati roots said reliance was is and will remain a gujarati company
social share
google news

Mukesh Ambani Gujarat Reliance: गांधीनगर: तेल ते दूरसंचार समूह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अभिमानाने आपण गुजराती असल्याचं मत जाहीर केलं. एवढंच नव्हे तर रिलायन्स (Reliance) ही गुजराती कंपनी होती, आहे आणि कायम राहील. असं विधानही त्यांनी केलं आहे. बुधवारी गांधीनगरमध्ये VGGS 2024 च्या उद्घाटन समारंभात बोलताना अंबानी म्हणाले की, ‘रियालन्सने गेल्या 10 वर्षांत गुजरातमध्ये एकूण $150 अब्ज (सुमारे 12 लाख कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. मला गुजराती असल्याचा अभिमान आहे आणि रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील.” (mukesh ambani showcased his gujarati roots said reliance was is and will remain a gujarati company)

ADVERTISEMENT

मुकेश अंबांनीकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक..

पुढे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले की, “तुम्ही विकसित भारताचा भक्कम पाया घातला आहे. 2047 पर्यंत भारताला 35 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही आणि मला दिसतंय की, एकटा गुजरात 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल.”

हे ही वाचा>> Exclusive Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून निवड

पुढे ते असंही म्हणाले की, “आम्ही 2030 पर्यंत नूतनीकरणक्षम उर्जेद्वारे गुजरातच्या उर्जेच्या निम्म्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास मदत करू.’ त्यांनी शेतकरी आणि लहान किरकोळ विक्रेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रिलायन्स रिटेलच्या विस्तार योजनेची घोषणा देखील केली.

हे वाचलं का?

रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) गुजरातमध्ये 5G रोलआउटबद्दल बोलताना ते म्हणाले, “5G-सक्षम एआय क्रांती गुजरातची अर्थव्यवस्था अधिक उत्पादक, कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवेल. रिलायन्स गुजरातला नवीन सामग्री आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेसह सक्षम करेल. पहिले पाऊल म्हणून, रिलायन्स हजीरा येथे भारतातील पहिली कार्बन फायबर सुविधा उभारत आहे.’

हे ही वाचा>> MNS : ‘राज ठाकरे दलाल, अमित खंडणीखोर’, मनसे नेत्याच्या आरोपानंतर तुफान राडा

Vibrant Gujarat Global Summit 2024 मध्ये, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की त्यांची कंपनी रिलायन्स पुढील 10 वर्षे गुजरातमध्ये गुंतवणूक करत राहील.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT