मुंबईची खबर : मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार नवी लोकल! कशी आहे ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन एसी ट्रेन? जाणून घ्या सविस्तर
लवकरच मुंबईकरांच्या सेवेत पहिली नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची लोकल ट्रेन येणार आहे. अशा पद्धतीची ही देशातील पहिली लोकल ट्रेन असणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार नवी लोकल!
कशी आहे ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन एसी ट्रेन?
जाणून घ्या सविस्तर
Mumbai News : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलमध्ये काळानुसार बदल होत आलेले आहेत. मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यादृष्टीने रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असते. असाच एक नवा निर्णय आता प्रशासनाने घेतला आहे. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत पहिली नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची लोकल ट्रेन येणार आहे. अशा पद्धतीची ही देशातील पहिली लोकल ट्रेन असणार आहे.
प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार
ही ऑटोमॅटिक दरवाजाची लोकल येत्या दोन दिवसात दाखल होणार असल्याची माहिती आहे. ही ट्रेन मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आणण्यात येणार आहे. सोलापूरमार्गे ही ट्रेन मुंबईत येईल. कुर्ला शेडमध्ये आणल्यानंतर तिथे लोकलची चाचणी केली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
हे ही वाचा : सहकारी महिलेच्या छातीकडे टक लावून पाहणे, 'चोरून पाहण्याच्या' गुन्ह्यात मोडत नाही, हायकोर्टाने ‘ती’ FIR केली रद्द
'अशी' आहे ट्रेन
या लोकल ट्रेनला एसी ट्रेनप्रमाणेच स्वयंचलित दरवाजे बसवले गेले आहेत. ही गाडी चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली आहे. या ट्रेनची चाचणी पूर्ण होऊन ती कधी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार याची वाट आता मुंबईकर पहात आहेत.
हे ही वाचा : मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार, जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?
अपघातावर उपाययोजना
सध्या धावत असलेल्या लोकल ट्रेनमधून पडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रवाशांची अफाट गर्दी आणि निष्काळजीपणा यामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत. लोकलच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं चित्र तर प्रत्येकानेच पाहिले आहे. यावर उपाय म्हणून ही ट्रेन सुरु करण्यात येईल. आता या नव्या ट्रेनची चाचणी यशस्वी ठरते का ते पहावे लागेल.









