भोंदू खरात प्रकरणात नवा खुलासा, विसाव्या वर्षी केलं होतं नात्यातील महिलेचं लैंगिक शोषण, त्यानंतर 15 वर्ष कुठं होता खरात?
खरातबद्दल पोलिस तपासात अजून एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. खरातचा गुन्ह्यांचा प्रवास हा अलीकडच्या काळातला नसून, जवळपास साडेचार दशकांपूर्वीचा आहे. 20 वर्षांचा असताना खरातने त्याच्या नात्यातल्या एका महिलोसोबत दुष्कृत्य केले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भोंदू खरात प्रकरणात नवा खुलासा
विसाव्या वर्षी केलं होतं नात्यातील महिलेचं लैंगिक शोषण
त्यानंतर 15 वर्ष कुठं होता खरात?
Ashok Kharat New Revelations : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या गुन्ह्यांची लिस्ट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तंत्र आणि मंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या ढोंगी बाबाचा खरा चेहरा आता लोकांसमोर आला आहे. खरातबद्दल पोलिस तपासात अजून एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. खरातचा गुन्ह्यांचा प्रवास हा अलीकडच्या काळातला नसून, जवळपास साडेचार दशकांपूर्वीचा आहे. 20 वर्षांचा असताना खरातने त्याच्या नात्यातल्या एका महिलोसोबत दुष्कृत्य केले होते.
20 व्या वर्षी केले पहिले शोषण
हा प्रकार घडला 1980 मध्ये. तेव्हा अशोक खरात (त्यावेळचं नाव : लक्ष्मण खरात) 20 वर्षांचा होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका लांबच्या नात्यातील महिलेला त्याने जादूटोण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात अडकवले. त्या महिलेला मूल होत नव्हते आणि याचाच फायदा घेत खरातने तिचे शोषण केले. याची माहिती जेव्हा गावकऱ्यांना समजली तेव्हा सगळे गावकरी संतापले. त्यांनी खरातला रंगेहात पकडले आणि त्याला चोप दिला. विरोधात गेलेले गावकरी आणि जीवाच्या भीतीने खरात फरार झाला.
हे ही वाचा : बीड : मस्साजोग येथील देशमुख कुटुंबीयांच्या घरात चोरी, सर्वजण झोपलेले असताना मध्यरात्री चोरट्यांनी मारला डल्ला
15 वर्ष खरात कुठं होता?
या घटनेनंतर खरात जवळपास 15 वर्ष गायब होता. या काळात तो कुठं होता, त्याला कुणी संरक्षण दिले याविषयी कुणालाच काही माहिती नाही. 15 वर्षानंतर जेव्हा तो कहंदलवाडीला पोहोचला तेव्हा त्याची ओळख पूर्णत: बदलली होती. त्याने आपले नाव बदलून अशोक खरात असे केले होते. आता पोलिस खरातच्या त्या 15 वर्षात काय घडले आणि त्याने आपले नाव का बदलले याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा : रिक्षा चालकावर जीव जडला, पत्नीने भयंकर कट रचला, बँक अधिकारी असलेल्या पतीला संपवलं
46 वर्ष जुन्या रेकॉर्डची तपासणी
खरातची दुष्कृत्ये फक्त जुन्या घटनांपुरतीच सीमित नाहीत. सध्या त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल आहेत. तपासात असे समोर आले आहे की, खरातशी संबंधित 15 ते 17 व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पोर्न साईट्सवर देखील प्रसारित झाले आहेत. खरात विरोधात अनेक महिलांनी समोर येऊन त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, जसजसा तपास पुढं सरकत जाईल तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. खरातचे 46 वर्ष जुने रेकॉर्ड तपासून पोलिस आता खरातच्या सगळ्या नेटवर्कला बाहेर काढण्यामध्ये व्यस्त आहेत.









