मुंबई : समोशाच्या पैशांवरुन वाद, ग्राहकाने दातांनी तोडले दुकानदाराचे बोट; धक्कादायक प्रकरण

मुंबई तक

समोसा आणि कटलेट खाल्ल्यानंतर ग्राहक आणि दुकानदारात वाद झाला. यादरम्यान रागाच्या भरात ग्राहकाने दुकानदाराचे बोट दातांनी चावून तोडले. याप्रकरणी ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Crime
Mumbai Crime
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई : समोशाच्या पैशांवरुन वाद

point

ग्राहकाने दातांनी तोडले दुकानदाराचे बोट

point

धक्कादायक प्रकरण

Mumbai Crime, दीपेश त्रिपाठी : मुंबईतील दिंडोशी परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले असून, रागाच्या भरात एका ग्राहकाने चक्क दुकानदाराचे बोट दाताने चावून तोडल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समोशाच्या पैशांवरुन वाद

दिंडोशी परिसरात रणजीत सिंह हे फास्ट फूडचे दुकान चालवतात. 28 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मीधर मलिक नावाचा व्यक्ती त्यांच्या दुकानात आला होता. त्याने समोसा आणि कटलेट खाल्ल्यानंतर बिलाच्या रकमेवरून रणजीत सिंह यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतरही आरोपी तिथेच थांबून दुकानदाराला शिवीगाळ करत होता, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा

दातांनी चावून बोट तोडले

जेव्हा रणजीत सिंह यांनी आरोपीला तिथून निघून जाण्यास सांगितले, तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्याने थेट दुकानदारावर हल्ला केला आणि झटापटी दरम्यान रणजीत सिंह यांचे बोट आपल्या दातांनी जोरात चावून तोडले. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा :  अशोक खरातच्या अश्लील Video मुळे 'ती' भीती... पीडितेच्या कुटुंबीयांना मागितलं Work from Home

आरोपीवर गुन्हा दाखल

या हिंसक घटनेनंतर दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मीधर मलिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका समोशाच्या वादातून झालेला हा वाद पाहून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
 

हे वाचलं का?