Gold Prices Today in Mumbai : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! खरेदीपूर्वी 1 तोळ्याचा भाव जाणून घ्या...
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आता पुन्हा एकदा बदल झाला आहे. ही चढउतार सातत्याने होतच असते. गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दर आता पुन्हा एकदा वाढले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईत सोन्याच्या दरात किती वाढ?
घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात आता पुन्हा एकदा बदल झाला आहे. ही चढउतार सातत्याने होतच असते. गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दर आता पुन्हा एकदा वाढले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी सादर केलेल्या बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण आता यामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला पाहायला मिळत आहे. चला तर मग, आजचे सोन्याचे भाव काय आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (mumbai gold silver price increase today 31st july know the price of 1 kg before buying)
ADVERTISEMENT
मुंबईत 1 तोळे (10 ग्रॅम) 24 कॅरेट सोन्याची किंमत आज (31 जुलै) 69,820 रूपये आहे. तर, 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64,000 रूपये आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी 86,500 रूपये प्रति किलोने विकली जात आहे. मंगळवारी (30 जुलै) ट्रेडमध्ये चांदीची किंमत 84,500 रूपये प्रति किलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतात बदलतात.
हेही वाचा : Annapurna Yojana GR : अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय? किती मिळणार पैसे?
तुमच्या शहरातील सोन्याचे दर पाहा...
मुंबई
-
24 कॅरेट सोन्याची किंमत 69,820 प्रति 10 ग्रॅम आहे.
हे वाचलं का?
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 64000 रुपये आहे.
पुणे
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,820 प्रति 10 ग्रॅम आहे.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 64000 रुपये आहे.
हेही वाचा : Maratha Reservation : "मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच"
नागपूर
- 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,820 प्रति 10 ग्रॅम आहे.
- 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 64000 रुपये आहे.
नाशिक
-
24 कॅरेट सोन्याची किंमत 69,850 प्रति 10 ग्रॅम आहे.
ADVERTISEMENT
22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 64,030 रुपये आहे.
ADVERTISEMENT
घसरणीनंतर सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीनाशुल्कात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana Payment: पहिला हफ्ता तीन हजारांचा, 'या' तारखेला खात्यात होणार जमा
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT