Annapurna Yojana GR : अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता काय? किती मिळणार पैसे?
Annapurna Scheme Eligibility : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू केली आहे. या योजनेतंर्गत वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती वाचा
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे?

अन्नपूर्णा योजनेची पात्रता काय आहे?

अन्नपूर्णा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार?
Maharashtra,annapurna scheme in marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना लागू करण्यात आली आहे. राज्यातील पात्र कुटुंबांना वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. त्याबद्दलचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. या योजनेचे निकष काय आहेत, कोणाला योजनेचे पैसे मिळणार, याबद्दल जाणून घ्या. (what is annapurna yojana maharashtra)
केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आता वर्षाला तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचे निकषही निश्चित करण्यात आले असून, बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
अन्नपूर्णा योजना पात्रता काय?
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.