बापरे! कोरोनाने हातपाय पसरले, 55 वर्षांची महिला Covid पॉझिटिव्ह, या भागासह मुंबईतही कोरोनाचा वाढतोय धोका

मुंबई तक

Corona Latest Update : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण साडपला आहे.

ADVERTISEMENT

लाक्षणिक चित्र
लाक्षणिक चित्र
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढतोय

point

महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?

point

जाणून घ्या कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

Corona Latest Update : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण साडपला आहे. नोएडाच्या सेक्टर 110 मध्ये राहणारी 55 वर्षांची महिली कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. महिलेला सौम्य लक्षण होते, असं बोललं जात आहे. महिला रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता, तिला कोरोनाची लागण झाल्याचं निर्दशनास आलं. या महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

या जिल्यातील मुख्य आरोग्य अधिकारी नरेंद्र कुमार यांनी म्हटलंय की, रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्रीही समोर आली आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांबाबत माहिती घेण्याचं काम सुरु आहे. रुग्णाच्या कुटुंबियांचे सॅम्पलही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयात टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे. लवकरच जास्तीत जास्त सॅम्पल तपासले जाणार आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही कुमार यांनी जनतेला केलं आहे. आरोग्य विभाग सतर्क आहे, सर्व आवश्यक पाऊले उचलली जातील, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा >> Maharashtra Weather: पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे, मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रात येणार तुफान पाऊस

मुंबईतही कोरोनाचा धोका वाढतोय

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 45 रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे. यामध्ये मुंबईत 35 रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे 4 रुग्ण सापडले आहे. रायगडमध्ये 2, ठाणे महानगरपालिकेत 1 रुग्ण आढळला आहे. या महिन्यात कोरोनाचे 177 रुग्ण आढळल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत कर्करोगाने ग्रस्त 59 वर्षीय महिला आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. 

हे ही वाचा >> Vaishnavi Hagawane Case: सुनांना मरणयातना देणाऱ्या हगवणेंचा भलताच उद्योग, बैलासमोर नाचवलेलं गौतमी पाटीलला!

हाँगकाँगमध्ये मागील दहा आठवड्यापासून 30 टक्के रुग्ण वाढत आहेत. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या फक्त हाँगकाँमध्येच नाही, तर सिंगापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. सिंगापूरमध्येही एका आठवड्यात 30 टक्के रुग्ण वाढले आहेत. चीन आणि थायलँडमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp