Govt Job: रेल्वेत प्रचंड मोठी भरती, तब्बल 6238 पदं भरणार.. तरूणांनो संधी सोडू नका!
रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून टेक्नीशियनच्या 6000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार RRB च्या rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ITI पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी
टेक्नीशियन पदासाठी 6000 हून अधिक जागांसाठी बंपर भरती
RRB recruitment 2025: 10 वी नंतर ITI पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून टेक्नीशियनच्या 6000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार RRB च्या rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
रेल्वे विभागाच्या या भरतीसाठी उमेदवार 28 जुलै 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच, 30 जुलै ही अर्जाचे शुल्क भरण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अर्जात सुधारणा करायची असल्यास 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान उमेदवार फॉर्ममध्ये दुरुस्ती करू शकतात.
RRB ने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतीअंतर्गत एकूण 23 पदांवरील 6238 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये टेक्नीशियन ग्रेड-I सिग्नल पदाच्या 183 रिक्त जागा आणि टेक्नीशियन ग्रेड-III पदाच्या एकूण 6055 रिक्त जागांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील टेक्निकल ग्रेड III फिटर (PU & WS) या पदावर सर्वाधिक म्हणजेच 2106 रिक्त जागांवर भरती करण्यात आली आहे. उमेदवार नोटिफिकेशन मधून सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे अभियांत्रिकीमध्ये म्हणजेच इंजिनीयरिंगमध्ये B.E/B.Tech, इंजिनीयरिंग डिप्लोमा किंवा B.Sc पदवी असणं आवश्यक आहे. टेक्नीशियन ग्रेड-III (ओपन लाइन, वर्कशॉप आणि पीयू) साठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह दहावी उत्तीर्ण किंवा PCM विषयांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.










