Govt Job: भारताच्या गुप्तचर यंत्रणेत नोकरी हवीये? मग 'ही' संधी अजिबात गमवू नका... लवकरच करा अप्लाय!

मुंबई तक

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजेंस ब्युरो म्हणजेच भारताच्या गुप्तचर यंत्रणेकडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये, ACIO ऑफिसर ग्रेड 2/टेक या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

भारताच्या गुप्तचर यंत्रणेत नोकरी हवीये?
भारताच्या गुप्तचर यंत्रणेत नोकरी हवीये?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या गुप्तचर यंत्रणेत नोकरी हवीये?

point

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी

point

'या' भरतीसाठी लवकरच करा अप्लाय!

Govt Job: गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजेंस ब्युरो म्हणजेच भारताच्या गुप्तचर यंत्रणेकडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये, ACIO ऑफिसर ग्रेड 2/टेक या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. देशाच्या गुप्तचर विभागात नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 16 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित केली आहे. 

पात्रता आणि वयोमर्यादा 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांकडे इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशनची पदवी किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी असणं आवश्यक आहे. तसेच, भरतीमध्य सहभागी होण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवांरांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 16 नोव्हेंबर 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: पनवेल ते कर्जत पर्यंतचा प्रवास आता फक्त एका तासात... रेल्वेची नवी मार्गिका कधी सुरू होणार?

या भरतीच्या माध्यमातून एकूण 258 रिक्त पदे भरली जाणार असून त्यापैकी 90 कंप्यूटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञानासाठी तसेच 168 जागा या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्ससाठी राखीव असतील.

हे ही वाचा: तिन्ही भावांना दुकानातून फरफटत बाहेर आणलं, नंतर तलवार आणि कुऱ्हाडीने वार... 10 जणांनी केला हल्ला अन् अखेर..

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम भारताच्या गुप्तचर विभागाच्या www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. नव्या पेजवर, आधी 'To Register' च्या शेजारी 'Click here' वर क्लिक करा. 
3. आता आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. 
4. यानंतर, Already Registered? To Login च्या बाजूला Click here वर क्लिक करून इतर आवश्यक माहिती भरून अर्ज भरून घ्या. 
5. शेवटी, निर्धारित शुल्क भरून अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp