तिन्ही भावांना दुकानातून फरफटत बाहेर आणलं, नंतर तलवार आणि कुऱ्हाडीने वार... 10 जणांनी केला हल्ला अन् अखेर..
21 ऑक्टोबरच्या रात्री तीन भाऊ त्यांच्या ऑटो पार्ट्सच्या दुकानात बसून एकमेकांसोबत गप्पा मारत होते. पण, नंतर त्यांच्यासोबत एक भयानक घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तिन्ही भावांना दुकानातून फरफटत बाहेर आणलं
भावांवर तलवार आणि कुऱ्हाडीने वार...
10 जणांनी केला हल्ला अन् अखेर..
Crime News: मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील बलबाहा गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 21 ऑक्टोबरच्या रात्री तीन भाऊ त्यांच्या ऑटो पार्ट्सच्या दुकानात बसून एकमेकांसोबत गप्पा मारत होते. पण, नंतर त्यांच्यासोबत एक भयानक घटना घडली.
त्या रात्री अचानक तलवारी, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन जवळपास 10 हल्लेखोर पीडित तरुणांच्या दुकानाकडे धावत आले. अनुराग शर्मा नावाच्या तरुणाने त्या 10 जणांच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. हल्लेखोरांनी कसलाच विचार न करता दुकानाचा दरवाजा तोडला आणि दुकानात बसलेल्या तिन्ही भावांना फरफटत दुकानाबाहेर आणलं. त्यानंतर, आरोपींनी त्यांच्यावर निर्दयीपणे हल्ला केला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: पनवेल ते कर्जत पर्यंतचा प्रवास आता फक्त एका तासात... रेल्वेची नवी मार्गिका कधी सुरू होणार?
तलवार आणि कुऱ्हाडीने वार
आरोपींनी पीडितांवर तलवार तसेच काठी आणि कुऱ्हाडीने वार केले. व्हिडिओ फुटेजमध्ये हल्लेखोर पीडित तरुणांचे हातपाय तोडताना स्पष्टपणे दिसत होते, मात्र तिथे उपस्थित असलेले काही लोक तो रक्तरंजित थरार पाहून खूश होत होते आणि घटनेचा व्हिडीओ बनवत होते. स्थानिकांनी हल्लेखोरांना हल्ला करण्यापासून रोखलं नाही. या भीषण हल्ल्यात एका भावाला जागीच आपला जीव गमवावा लागला. उर्वरित दोघांना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. उपचारादरम्यान, दुसऱ्या भावाला सुद्धा गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच, तिसरा भाऊ गंभीररित्या जखमी असून त्याला बिलासपुर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा: Govt Job: आता 10 वी पास उमेदवारांनी मिळवा ISRO मध्ये नोकरी! जाणून घ्या पात्रता अन् पटापट करा अर्ज...
घटनेचा तपास सुरू...
पीडित तरुणांच्या कुटुंबियांना असा आरोप केला की घटनेनंतर त्यांनी लगेच पोलिसांना फोन वारंवार फोन केला, परंतु बराच वेळ उलटूनही त्यांना मदत मिळाली नाही. पोलीस चौकीचे इन्चार्ज आशिष झरिया यांनी निष्काळजीपणा दाखवला आणि कदाचित ते या गुन्ह्यात सहभागी होते, असा त्यांचा दावा आहे. दुसऱ्या दिवशी या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रस्ता रोखला. त्यावेळी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लवकरात लवकर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन दिलं.










