जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा! कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली अन्...
एनरॉन स्कँडलने संपूर्ण अमेरिकेला हादरून ठेवलं होतं. यामुळे मोठ्या कंपन्या नेहमीच विश्वासार्ह नसतात, हे जगाला दाखवून देण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा!
कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली अन्...
Crime News: एनरॉन स्कँडलने संपूर्ण अमेरिकेला हादरून ठेवलं होतं. यामुळे मोठ्या कंपन्या नेहमीच विश्वासार्ह नसतात, हे जगाला दाखवून देण्यात आलं होतं. 1985 मध्ये अमेरिकेतील ह्युस्टन येथे असलेल्या एनरॉन कॉर्पोरेशनमध्ये ही घटना घडली. सुरुवातीला ती फक्त एक साधी गॅस पाइपलाइन कंपनी होती. पण कालांतराने, एनरॉनचं नाव शेअर मार्केटमध्ये वाढू लागलं. त्याची कमाई वाढली आणि गुंतवणूकदार रातोरात करोडपती होण्याचं स्वप्न पाहू लागले. एनरॉनचे CEO जेफ्री स्किलिंग, चेअरमन केन ले आणि CFO अँड्र्यू फास्टो यांना कॉर्पोरेट हिरो म्हणून पाहिलं जात होतं.
एनरॉनची खरी कहाणी अकाउंटिंगच्या योजनांपासून सुरू झाली. कंपनीने बऱ्याच तोट्यात असणाऱ्या व्यवसायिक उपक्रमांना फायदेशीर म्हणून दाखवण्यास सुरुवात केली. खोटे आकडे तयार करून कंपनी दरवर्षी प्रचंड नफा कमवत असल्याचा दाखवलं गेलं. कंपनीकडे 'मार्क-टू-मार्केट अकाउंटिंग' नावाची एक अनोखी टेक्निक होती. यामध्ये भविष्यातील कोणत्याही डीलमधील अंदाजे नफा त्याच दिवशी नोंदवला जायचा.
शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली
याव्यतिरिक्त, तोटा लपवण्यासाठी आणि कंपनीच्या बॅलन्स शीटमधून कर्ज काढून टाकण्यासाठी Special Purpose Entities (SPEs) नावाच्या अकाउंटिंग ट्रिक्सचा वापर करण्यात आला. गुंतवणूकदार आणि शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. जेव्हा शेअर्सच्या किमती उफाळून वर येतात तेव्हा गुंतवणूकदारांना वाटते की कंपनी मजबूत आहे. एनरॉनने हा भ्रम तयार केला. टीव्हीवर एनरॉनची स्तुती, मासिकांच्या कव्हर पेजवर या कंपनीचे अधिकारी म्हणजेच एनरॉन कंपनीची जादू सर्वत्रच होती.
हे ही वाचा: पत्नीला इंस्टाग्रामवर रील बनवायचा नाद... पती संतापला अन् किरकोळ वादातून घडली भयानक घटना
अचानक शेअर्स घसरले
पण खरं काय ते वेगळंच होतं. या सगळ्या प्लॅनिंगमधून कर्ज वाढत होतं आणि खरा नफा जवळपास नव्हता. जुलै 2001 मध्ये, CEO जेफ्री स्किलिंग यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे, काहीतरी मोठी गडबड असल्याचं लक्षात आलं. काही महिन्यांनंतर, अकाउंटिंग रिपोर्ट्समध्ये तफावत दिसू लागली. गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी शेअर्स विकायला सुरुवात केली. काही आठवड्यांतच, एकेकाळी 90 डॉलर्स पर्यंत पोहोचलेले शेअर्स फक्त 1 डॉलर्सवर घसरले.










