Numerology: गणपती बाप्पाचा आवडता अंक! तुमचंही 'या' नंबरशी असू शकतं खास कनेक्शन
Jyotish Shastra : अंकशास्त्रानुसार मूलांक 5 च्या लोकांवर गणपती बाप्पाचा (Ganpati Bappa) विशेष आशीर्वाद असतो. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल मूलांकांद्वारे जाणून घेऊ शकता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अंकशास्त्रानुसार मूलांक 5 च्या लोकांवर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो.
या विशेष उपायांमुळे बाप्पाची कृपा प्राप्त होते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय
Jyotish Shastra : अंकशास्त्रानुसार मूलांक 5 च्या लोकांवर गणपती बाप्पाचा (Ganpati Bappa) विशेष आशीर्वाद असतो. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल मूलांकांद्वारे जाणून घेऊ शकता. जर तुमची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 असेल तर तुमची मूलांक संख्या 5 असते. या मूलांकाचा स्वामी बुध आहे आणि याच बुध ग्रहाचा कारक देवता गणपती बाप्पा आहे. त्यामुळे 5 मूलांक बाप्पाला प्रिय असतो. (numerology mulank 5 jyotish ganesh chaturthi 2024 special bappa favourite number these mulank get special blessings of lord ganpati)
ADVERTISEMENT
यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आहे. या काळात देखील मूलांक 5 च्या लोकांवर बाप्पाची विशेष कृपा राहील. या दिवशी बाप्पाची पूजा करणे लाभदायक ठरेल.
हेही वाचा : Ganesh Chaturthi 2024: राशीनुसार बाप्पाची करा 'अशी' विशेष पूजा, सर्व विघ्न होतील दूर!
धन, बुद्धी आणि आरोग्यदाता बाप्पा पुराणानुसार, श्रीगणेशाची आराधना केल्याने शत्रू आणि ग्रहांच्या अशुभ दृष्टीपासून रक्षण होते, म्हणूनच गणेशाला संकट दूर करणारा म्हटलं जातं. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे माणसाला धन, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.
हे वाचलं का?
गणेश चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय
मूलांक 5 च्या लोकांनी गणेश चतुर्थीला काही उपाय (Ganesh Chaturthi Remedies) केले पाहिजे. या विशेष उपायांमुळे बाप्पाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.
हेही वाचा : Gold Price Today: सोन्याच्या भावात तुफान तेजी! जाणून घ्या आजची 1 तोळ्याची किंमत...
- गणपतीला दुर्वा अर्पण करा.
- बाप्पाला हिरव्या वस्तू दान करा.
- मुलांना वाचन आणि लेखन साहित्य भेट द्या.
- गाईला हिरवा चारा द्या.
- रुग्णालयांना आवश्यक औषधं दान करा.
- गणेश मंत्राचा जप करा
गणेश चतुर्थीच्या दिवशी मूलांक 5 असलेल्या लोकांनी 108 वेळा गणेश मंत्राचा जप करावा. बाप्पाचा हा शक्तिशाली मंत्र जीवनात आनंद आणतो. बुद्धीदाता गणेश भक्तांचं जीवन संपत्ती आणि धनधान्याने भरतो. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमधील सर्व अडथळे नष्ट करतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT