‘चहा प्यायला रूपया नाही’, संसदेतील हल्ल्यानंतर अमोल शिंदेच्या कुटुंबियांची कशी आहे अवस्था?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

parliament security breach accused amol shinde family bad condition in village request to government
parliament security breach accused amol shinde family bad condition in village request to government
social share
google news

Parliaments Security Breach  Amol Shinde : संसदेत घुसखोरी करत धुरांच्या नळकांड्या फोडून विरोध प्रदर्शन करणाऱ्या 6 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यामधील एक आरोपी लातूरचा अमोल शिंदे देखील आहे. या अमोल शिंदे यांच्या अटकेनंतर आता त्याच्या कुटुबियांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. अमोलच्या कुटुंबियांचा रोजगार हिरावला, चहापत्तीसाठी पैसै नाही, कुणी उसने पैसै देईना इतकी बिकट अवस्था अमोलच्या कुटुंबियांची झाली आहे. तसेच आई-वडिलांनी आता अमोल सोबत आमचं एकदा तरी बोलणं करून द्यावं अशी सरकारकडे मागणी देखील केली आहे. (parliament security breach accused amol shinde family bad condition in village request to government)

अमोल शिंदेचे वडील धनराज शिंदे व आई यांनी प्रशासनाकडे मागणी करत म्हंटलय की 9 तारखेपासून अमोलचा आणि आमचा संपर्क नाही.हे प्रकरण झाल्यापासून आम्हीं चार दिवसापासून घरीच आहोत. आम्हाला गावांमध्ये कोणी रोजगारही देत नाही.तुम्ही जर आमच्या शेतात कामाला आलो तर पोलीस आम्हालाही विचारतील असं गावकरी म्हणत आहेत. यामुळे काम मिळत नसल्याने माझी परिस्थिती सध्या अशी आहे की मी चहापत्ती सुद्धा घरी विकत आणू शकत नाही. आम्ही अगोदरच बऱ्याच लोकांकडून पैशाची उचल घेतली आहे, त्यामुळे आम्हाला आता कोणी उसने पैसे मागितले तरी देत नाही, अशी अवस्था झाल्याचे अमोलचे कुटुंबिय सांगतात.

हे ही वाचा : Crime: मुरबाडमध्ये माजी सभापतीने तरुणाचे दोन्ही हातच छाटले, पंजाही कापून फेकला!

अमोलच्या अटकेनंतर आई -वडिलांशी त्याचा आतापर्यंत संपर्क न झाल्याने त्याच्या आठवणींमध्ये अमोल चे वडील धनराज शिंदे यांनी त्याचा टी-शर्ट घातला. विशेष म्हणजे या टी-शर्ट वरती भगतसिंग, सुखदेव ,आणि राजगुरू यांचा फोटो आहे. अमोल शिंदे हा भगतसिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना फॉलो करत असल्याने त्याने असे अनेक टी-शर्ट बनवून घेतले होते.भगतसिंग यांच्या विषयी ची पुस्तके वाचण्याची त्याला आवड होती सोबतच या सर्व क्रांतिकार्यांसारखं मलाही सैन्य व पोलीस भर्ती मध्ये जाऊन देशाची सेवा करायची आहे असं तो नेहमी म्हणत असल्याचं त्याच्या आईने यावेळी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Uddhav : ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्ला, ‘तुम्ही अदानीचं बूट चाटताय’

दरम्यान या सर्व गोष्टींचा विचार करून आमची शासनाने दखल घ्यावी व अमोल आणि आमचा संपर्क करून द्यावा अशी मागणी देखील अमोलच्या आई-वडिलांनी केली आहे. त्यामुळे आता कुटुंबियांना आता अमोल शिंदेना भेटायला परवानगी मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT