Kalyan: भामट्याचा कहरच.. शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्ला ‘असा’ केला स्वत:च्या नावावर

मुंबई तक

ADVERTISEMENT

person pretending to be a descendant of historic durgadi fort site in kalyan transferred fort site to his own name on basis of forged documents
person pretending to be a descendant of historic durgadi fort site in kalyan transferred fort site to his own name on basis of forged documents
social share
google news

Kalyan Durgadi Fort: कल्याण: बंटी-बबली या चित्रपटात ताजमहल आपल्या नावे करुन त्याचे बनावट कागदपत्रं तयार करून विक्री करण्याचा प्रसंग चित्रपटात दाखविण्यात आला. अशाच प्रकारे कल्याणमधील (Kalyan) ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या (Durgadi Fort) जागेचे वंशज दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे किल्लाच आपल्या नावावर केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. मात्र, जागा विक्री होण्यापूर्वीच हा संपूर्ण प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला आहे. (person pretending to be a descendant of historic durgadi fort site in kalyan transferred fort site to his own name on basis of forged documents)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन अशा कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून किल्लाची जागा नावावर करणाऱ्या आरोपी विरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. अधिकारी प्रीती घुडे यांनी 2 नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के (सातवाहन) याच्यावर भादंवि कलम 420, 465, 466, 468, 471, 773, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिर्केने केलेला घोटाळा कसा झाला उघडकीस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला सुयश शिर्के याने 12 सप्टेंबर 2022 रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी ना-हरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील 5 ते 7 कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्र अर्जसोबत जोडले होते. सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यलयात पाठविण्यात आले होते.

हे ही वाचा>> रेव्ह पार्टी, सापांचं विष.. ‘वर्षा’वर आरती करणारा एल्विश यादव नेमका कोण?

दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यलयाशी पत्र व्यवहार करून किल्ल्यासंदर्भात लेखी माहिती मागवली असता, सदरची जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी दयावी असा उल्लेख करत पोलिसांना कळविण्यात आले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

तर दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात या किल्ल्याच्या जागे संदर्भात 24 फेब्रुवारी 2023 रोजी दस्तावेज तपासणी दरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेल्या दस्तावेज आढळून आल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा>> Diwali 2023 Muhurat: दिवाळी, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी? पण प्रदोष काळात…

या संर्दभात सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याशी संपर्क साधला असता, दुर्गाडी किल्ल्याची जागा आपल्या वंशजाची आहे. असे भासवून खोटी कागदपत्र तयार केल्याने सुयश शिर्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शिर्के हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटकस्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT