फोगट बहिणी पडल्या रस्त्यावर, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी दिल्लीत राडा
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटू आक्रमक झालेले आहेत.
ADVERTISEMENT

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटू आक्रमक झालेले आहेत. महिन्यापेक्षा अधिक काळापासून कुस्तीपटू मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असून आज दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे निघालेल्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचे तंबूही हटवले.
23 एप्रिलपासून जंतर-मंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सकाळी 11.30 वाजता कुस्तीपटू नवीन संसद भवनाकडे रवाना झाले. कुस्तीपटूंना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते.
हेही वाचा >> ‘घराणेशाहीत अडकलेल्यांना सावरकरांचं…’, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका
नवीन संसद भवन बाहेर जाण्यासाठी निघालेल्या पैलवानांनी बॅरिकेड्स तोडले. त्यावेळी पोलिसांनी साक्षी मलिकसह काही कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. नवीन संसद भवनापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर पैलवान ठाम राहिले. शांततापूर्ण मोर्चा काढणे हा आपला हक्क असल्याची भूमिका कुस्तीपटूंनी घेतली आणि दिल्ली पोलीस देशविरोधी असल्याचा आरोप केला.
जंतरमंतर ते नवीन संसद भवनाकडे कुस्तीपटू निघाले अन्…
पोलिसांनी बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरू केलं. त्याआधी विनेश फोगट यांनी महिला महापंचायतीसाठी येणाऱ्या सर्व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत एका व्हिडिओतून केला.