PM Modi on IND vs PAK Match: भारत की पाकिस्तान, कोणता क्रिकेट संघ चांगला? पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलं 'हे' उत्तर
भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळपास १२ वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही. एका अमेरिकन पॉडकास्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन्ही संघांबद्दल प्रश्न विचारला. पाहा यावेळी PM मोदी काय म्हणाले.
ADVERTISEMENT

IND vs PAK and PM Modo: नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमनशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटमध्ये दिसणाऱ्या शत्रुत्वावरही प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदींना विचारण्यात आले की भारतीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट संघात कोण चांगले आहे?
यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सामन्याचे निकाल कोणता संघ चांगला आहे हे ठरवतात. अलिकडेच, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानने केले होते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना खेळवण्यात आला.
हे ही वाचा>> एक पाय नसलेली जीन्स! 'विचित्र फॅशन' Viral, या जीन्सची किंमत विचारूच नका...
पंतप्रधान मोदींनी स्पर्धेचे नाव न घेता याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अलिकडेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना झाला, त्या सामन्याचा निकाल सांगतो की कोणता संघ चांगला आहे.
पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले होते की भारत किंवा पाकिस्तान या दोघांपैकी कोणाचा क्रिकेट संघ चांगला आहे? दोन्ही संघांमध्ये भू-राजकीय तणाव देखील आहे. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'खेळ संपूर्ण जगाला उर्जेने भरतात, क्रीडा वृत्तीची भावना जगाला जोडते, म्हणून मला खेळांची बदनामी होताना पहायला आवडणार नाही, मी खेळांना मानवी विकास प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग मानतो.'
