Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

modi pune visit schedule : narendra modi honoured with lokmanya tilak award
modi pune visit schedule : narendra modi honoured with lokmanya tilak award
social share
google news

Narendra Modi pune visit today : प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात (pm modi pune visit) आले. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात अनेक घटना घडल्या. पंतप्रधानांनी पुण्यात आल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली. पण, यातील काही गोष्टींची चांगलीच चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सकाळी पुणे विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर पोहोचले. तिथून मोदी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे रवाना झाले. मंदिरात जाऊन मोदींनी पूजा आणि आरती केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मोदींच्या स्वागतासाठी कोण कोण आलं?

कृषी महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर पंतप्रधान मोदींचं आगमन झालं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुख्य सचिवांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

वाचा >> PM Modi in Pune : “शरद पवार यांना संधी साधता आली असती”, ठाकरेंचे चिमटे

नरेंद्र मोदींचं अजित पवारांनी स्वागत केले. दोन्ही हस्तांदोलन करतानाचा फोटो समोर आला असून, यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीबद्दल चर्चा होत आहे. शिंदे चष्मा काढून अजित पवार आणि अजित पवार यांच्याकडे बघत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

शरद पवार एकटेच बसले व्यासपीठावर

पुरस्कार सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात आधी कार्यक्रमस्थळी हजर झाले. या कार्यक्रमासाठी सर्वात आधी आल्यानंतर शरद पवार हे एकटेच व्यासपीठावर जाऊन बसले. बराच वेळ बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर आले. त्यानंतर शरद पवारांनी हस्तांदोलन करत स्वागत केलं. यावेळी पवारांनी मोदींच्या खांद्यावर थापही मारली आणि सुहास्य केलं.

वाचा >> Samruddhi Mahamarg Accident : पूल कसा कोसळला, मृत्यु झालेल्या 17 लोकांची नावं काय?

अजित पवारांनी पवारांशी हस्तांदोलन टाळलं

पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवांरासोबत हस्तांदोलन करणे टाळले. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस समोरुन आले आणि त्यांनी शरद पवारांना हस्तांदोलन केलं. मात्र, अजित पवार मागून जाऊन खुर्चीवर जाऊन बसले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT