Priya Singh ढसाढसा रडली अन्…, ‘MSRDC संचालकाच्या मुलाने माझ्यासोबत..’

रोहित गोळे

ADVERTISEMENT

priya singh tearfully told the truth of that night serious allegations made against ashwajit gaikwad son of msrdc director
priya singh tearfully told the truth of that night serious allegations made against ashwajit gaikwad son of msrdc director
social share
google news

Priya Singh interview: ठाणे: MSRDC चे संचालकाचा मुलगा अश्वजीत गायकवाडबाबत त्याची प्रेयसी प्रिया सिंह हिने आता बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. प्रिया सिंहने क्राइम तकशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. माझी फसवणूक झाली आहे. पोलिसांनी आरोपींवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी इच्छा आहे. मी 11 दिवस रुग्णालयात दाखल आहे. देवाने मला वाचवले. माझं संपूर्ण करियर उद्ध्वस्त झालं. मी पोलीस आणि सरकारला विनंती करते की त्यांनी माझी विनंती ऐकावी.’ आरोपी अश्वजीतच्या सांगण्यावरून त्याच्या ड्रायव्हरने प्रियाला कारने चिरडले होते. मागील 11 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. (priya singh tearfully told the truth of that night serious allegations made against ashwajit gaikwad son of msrdc director)

ADVERTISEMENT

प्रिया सिंहचे गंभीर आरोप

प्रिया सिंह म्हणाली की, ‘माझा आत्मा समाधानी नाही.’ यावेळी बोलताना प्रियाला तिचे अश्रू रोखता आले नाही. ढसाढसा रडत प्रिया म्हणाली की, ‘आमच्या दोघांमध्ये चांगले संबंध होते. मला कधीही असुरक्षित वाटेल असं तो वागला नाही. आम्ही दोघेही न घाबरता सगळीकडे फिरलो. कालपर्यंत तो मुलगा माझ्यासाठी रडायचा, पण आज त्यानेच माझी अशी अवस्था केली आहे. मी मोडून पडली आहे. त्याने मला सांगितले होते की, त्याचा आणि त्याच्या बायकोचा घटस्फोट झाला आहे. तेव्हाच मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आले.’

घटनेच्या रात्रीचे वर्णन करताना प्रिया म्हणाली, ‘मी त्या रात्री एका कार्यक्रमात होते. मी त्याची वाट पाहत होतो, पण तो आला नाही. तो जिथे होता तिथे मी त्याला भेटायला गेले. त्यावेळी अश्वजीत माझ्याशी विचित्र वागत होता. त्यावेळी त्याने त्याच्या ड्रायव्हरला पाठवलं. ड्रायव्हरने मला गाडीत बसण्यास सांगितले. पण मी त्याला नाकार दिला. पण नंतर मी ड्रायव्हरसोबत गाडीत गेले. त्याने गाडी सर्व्हिस रोडवर नेली. काही वेळाने अश्वजीत गाडीजवळ आला. मी त्याला एकांतात बोलायचं आहे असं सांगितलं, पण तो तयार नव्हता. तेथे त्याचे काही मित्रही उपस्थित होते.’

‘सगळे मला शिव्या देऊ लागले. त्याचे मित्र आमच्या नात्यात ढवळाढवळ करायचे. तो त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नव्हता, तो माझ्यावर नियंत्रण ठेवत होता. यानंतर अचानक अश्वजीतने माझा गळा आवळला. त्यांनी मला मारहाण केली. यानंतर अश्वजीत आपल्या मित्रांसह कारमध्ये बसला आणि पळून जाऊ लागला. मी गाडीसमोर उभी राहिले, कारण माझे सामान गाडीत होते. यानंतर त्यांनी कारच माझ्या अंगावर चढवली. यावेळी सागर गाडी चालवत होता. यावेळी मला धडक मारल्यानंतर सर्व आरोपींनी तिथून पळ काढला. त्यानंतर बराच वेळ मी रस्त्यावर पडून होते.’

प्रिया म्हणाली, ‘सुरुवातीला मला कोणीही मदत केली नाही. त्यानंतर एक मुलगा स्कूटरवर येत होता. मी त्याच्याकडे मदत मागितली, त्याने मला मदत केली. यानंतर आरोपी पुन्हा दुसऱ्या गाडीने मला पाहण्यासाठी रुग्णालयात आले. माझी मागणी आहे की, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.’

 

हे ही वाचा >> Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन खासदार लोकसभेतून निलंबित

अश्‍वजीतने त्याच्या साथीदारांसह प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला आणि तिला कारने चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्वजीत विवाहित होता आणि त्याने ही गोष्ट आपल्या प्रेयसीपासून लपवली होती. आरोप आहे की, 11 डिसेंबरला प्रिया सिंहने तिचा प्रियकर अश्वजीतला पत्नीसोबत पाहिले होते. यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली होती. यादरम्यान, अश्वजीत आणि त्याचे तीन मित्र रोमिल, प्रसाद पाटील आणि सागर शेळके यांनी प्रियाला प्रथम मारहाण केली. यानंतर तिला कारने चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी 26 वर्षीय प्रिया सिंह ही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. प्रिया सिंह महाराष्ट्रातील एमएसआरडीसीचे संचालकांचा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>  Dawood भारतातून फरार झाला ‘त्या’ रात्रीची कहाणी, मंत्रालयात ‘त्या’ नेत्याला फोन अन्…

पोलिसांनी आरोपी अश्वजित गायकवाड आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 3232 (जाणूनबुजून दुखापत करणे), 279 (रॅश ड्रायव्हिंग), 504 (नियमांचे उल्लंघन करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. पण दुसऱ्याच दिवशी सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT