Video : 'नाही नाही' म्हणत राहिला, पण कुत्र्यांनी सोडलंच नाही...चिमुकल्याचे तोडले लचके!

मुंबई तक

ADVERTISEMENT

pune dog attack child injured after stray dog attack chakan area cctv capture shocking incident video viral
भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला

point

भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके

point

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Pune Dog Attack Video : स्मिता शिंदे, जुन्नर,पुणे : पुण्यातील चाकण (Chakan) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भटक्या कुत्र्यांनी (stray dog) चिमुकल्यावर हल्ला (Child) केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 7 ते 8 कुत्र्यांनी मिळून हल्ला करत चिमुकल्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. चाकणजवळील कडाचीवाड) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही (Video Viral) समोर आला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (pune dog attack child injured after stray dog attack chakan area cctv capture shocking incident video viral) 
 
चाकण जवळील कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत होता. या दरम्यान भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्या मुलावर हल्ला केला. कुत्र्यांनी चिमुकल्याला खाली पडुन त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला.यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. तसेच या घटनेचा अंगावर काटा आणणार थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

व्हिडिओत काय? 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मुलगा रस्त्यावर खेळताना दिसतोय. या दरम्यान एक कुत्रा या चिमुकल्यासमोर येतो आणि त्यांच्यावर भूंकू लागतो. कुत्र्याच्या भूंकण्यानंतर चिमुकला थांबतो आणि 'नाही नाही' म्हणत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. मात्र कुत्रा त्याला न जुमानता थेट त्याच्या अंगावर झेप घेतो. ज्यामुळे चिमुकला खालीच पडतो.

चिमुकला खाली पडल्यानंतर पुन्हा उभं राहून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र इतक्यात इतर कुत्रे जमतात आणि त्याला घोळका करून त्याला पुन्हा पाडतात आणि त्याचे लचके तोडायचा लागतात. चारही बाजूने चिमुकल्यावर कुत्र्यांचा हल्ला सुरु असतो. या दरम्यान बाजूलाच राहणारी एक महिला घराबाहेर पडते आणि कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्न करते. तसेल महिलेनंतर काही पुरूष देखील धावत येतात आणि चिमुकल्याची त्या कुत्र्यांपासून सूटका करतात. या घटनेत आता चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहून लोकांचं काळीज पिळवटुन निघतेय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Video : दिघे साहेबांच्या आश्रमात शिंदेंच्या सेनेने नोटा उधळल्या, 'पावित्र्य नष्ट केल्याची' ठाकरे गटाची टीका

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT