Pune: दोन तरुणींचा हृदय पिळवटून टाकणारा मृत्यू CCTV मध्ये कैद, सिमेंट मिक्सर ट्रकच...
pune heartbreaking death of two college girls captured on cctv tragic death of the girls crushed under a cement mixer truck
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कॉलेजच्या दोन मुलींवर काळाने घातला एका क्षणात घाला

हिंजवडीमधील अत्यंत भयंकर अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

सिमेंट मिक्सर ट्रकखाली चिरडून दोन मुलींचा मृत्यू
कृष्णा पांचाळ, पुणे: पुण्यातील हिंजवडी येथे सिमेंट मिक्सर ट्रकच्या अपघातात दोन कॉलेजवयीन मुलींचा अत्यंत दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या भयंकर अपघाताचं आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ही घटना हिंजवडी येथे काल (24 जानेवारी) दुपारी 3.30 वाजता घडली. या घटनेप्रकरणी सिमेंट मिक्सर ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. (pune heartbreaking death of two college girls captured on cctv tragic death of the girls crushed under a cement mixer truck)
नेमका कसा घडला अपघात?
प्रांजली यादव आणि अश्लेषा गावंडे अशी मृत तरुणींची नावं आहेत. प्रांजली बीसीएच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती आणि अश्लेषा एमसीएच्या पहिल्या वर्षात शिकत होती. या घटनेप्रकरणी चालक अमोल वाघमारेला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> इअरफोन घालणं जीवावर बेतलं.. 16 वर्षांच्या मुलीचा कसा गेला जीव?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास हिंजवडीतील साखरे-पाटील चौकात अचानक एक जड सिमेंट मिक्सर ट्रक उलटला. या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या दोन मुली थेट ट्रकखाली आल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रांजली यादव आणि अश्लेषा गावंडे या त्यांच्या दुचाकीवरून चौकातून जात असतानाच समोर येणारा सिमेंट मिक्सर ट्रक उलटला आणि ज्याच्या खाली या दोनी तरूणी आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे सिमेंट मिक्सर ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळेच मिक्सर चौकात उलटला. प्रांजली आणि अश्लेषा त्याचवेळी चौकातून विरुद्ध दिशेला जात होत्या. पण अगदी काही क्षणातच ट्रकखाली दोघी आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा>> Viral Video: विमानात केली 'ती' गोष्ट, एअर होस्टेसचा तर कार्यक्रमच झाला...
दरम्यान, या अपघातात काही जण जखमी झाल्याचेही समजते आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज हे अत्यंत हृदयद्रावक आहे.