Meera Borwankar : बोरवणकरांच्या बदलीला आर.आर पाटलांनी केला होता विरोध -पृथ्वीराज चव्हाण

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

prithviraj chavan reaction on meera borwankar allegations against ajit pawar.
prithviraj chavan reaction on meera borwankar allegations against ajit pawar.
social share
google news

Meera Borwankar prithviraj chavan : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांची जमीन देण्यास विरोध केल्यामुळे करिअरवर परिणाम झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता याच प्रकरणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आघाडीबरोबरच आर.आर. पाटलांवर ठपका ठेवला आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील येरवडा येथील पोलिसांची जमीन शाहीद बाजवा या बिल्डरला हस्तांतरित करण्यास अजित पवारांनी सांगितले होते. पण, मी त्याला विरोध केला असा दावा मीरा बोरवणकर यांनी केला आहे. यामुळे मला पुण्यातील ‘सीआयडी’चे प्रमुखपद मिळाले नाही, असा आरोप बोरवणकर यांनी केला आहे.

बोरवणकरांच्या आरोपावर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणावर खुलासा करताना ते म्हणाले की, “बोरवणकर यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली करताना प्रोटोकॉलप्रमाणे माझ्या कार्यालयातील कुणीतरी त्यांच्याशी संपर्क केला असावा. त्यांना पुण्यातच गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती हवी होती. पण तत्कालीन गृहमंत्र्यांनी (आर.आर. पाटील) त्याला विरोध केला होता. मित्र पक्षाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) विरोधामुळे त्यांची ‘सीआयडी’मध्ये बदली करता आली नव्हती”, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> अजित पवारांना थेट भिडलेल्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण?

मीरा बोरवणकर यांचा नेमका आरोप काय?

बोरवणकर यांनी म्हटलं आहे की, “मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर मला पुण्यामध्ये बदली हवी होती. माझे कुटुंब पुण्यात होते. ‘सीआयडी’चे प्रमुखपद रिक्त असून मला ते दिले जावे अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली होती. त्यांनी ‘आघाडी धर्म पाळावा लागेल. त्यांचा (राष्ट्रवादी काँग्रेस) तुम्हाला विरोध आहे’, असे चव्हाण म्हणाले होते.”

हेही वाचा >> “दादा’ आरआर पाटलांबद्दल जे बोलले ते सांगू शकत नाही”, मीरा बोरवणकरांचा स्फोट

“त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने येरवडा कारागृहाचे अपर महासंचालकपद तुम्ही घेता का, अशी विचारणा केली होती. मग, ते पद स्वीकारले”, असे बोरवणकर यांनी म्हटलेलं आहे. बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक सध्या प्रचंड चर्चेत असून, त्यातील द मिनिस्टर या प्रकरणात या सगळ्याबद्दल लिहिलेलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT