Rajkot Fire : सुट्टीचा दिवस, 99 रुपयांची स्कीम अन्  27 जणांचा जळून कोळसा, काय घडलं?

मुंबई तक

Rajkot fire Accident news : गुजरातमधील राजकोट येथे असलेल्या गेमिंग झोनमध्ये शनिवारी भयंकर दुर्घटना घडली. यात तब्बल २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

राजकोटमधील गेमिंग झोनला आग का लागली?
आगीत भस्मसात झालेले टीआरपी गेमिंग झोन.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजकोटमध्ये गेमिंग झोनला भीषण आग

point

२७ लोकांचा मृत्यू

point

गेमिंग झोनला आग का लागली?

Rajkot Fire Latest News : सगळीजण जण सुट्टीचा आनंद लुटत असतानाच दबा धरून बसलेल्या काळाची दृष्ट लागली अन् अवघ्या काही वेळात होत्याचे नव्हते झाले. हे घडलं राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे! या आगीत 9 मुलांसह 27 जणांचा जळून कोळसा झाला. (Massive fire breaks out at gaming zone in Gujarat's Rajkot)

शनिवारी आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने बचावकार्य सुरू केले. आग लागली तेव्हा गेमिंग झोनमध्ये मोठ्या संख्येने लोक होते, कारण सुट्टीच्या दिवशी गर्दी आकर्षित करण्यासाठी गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाने प्रवेश शुल्क फक्त 99 रुपये केले होते. सुट्टीचा दिवस असल्याने आणि फी फक्त 99 रुपये असल्याने प्रचंड गर्दी उसळली होती. 

इतकी भीषण आग का लागली?

आगीला चिथावणी दिली ती, या गेमिंग झोनमध्ये असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या मोठ्या साठ्याने. गेमिंग झोनमध्ये 1500 ते 2000 लिटर डिझेल आणि गो कार रेसिंगसाठी 1000 ते 1500 लिटर पेट्रोल ठेवण्यात आले होते. पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यादव यांनी आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाले असल्याची माहिती दिली.

हेही वाचा >> भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "राजकोटमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. या घटनेत अनेक कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे ३ वाजेपर्यंत तपास सुरू करण्याचे निर्देश एसआयटीला देण्यात आले आहेत. ज्या विभागांतर्गत गेम झोनच्या बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यांनी आज पहाटे ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. आजपासूनच सर्व प्रकारची चौकशी सुरू होणार असून लवकरच न्याय मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाईल."

हे वाचलं का?

    follow whatsapp