Lok Sabha 2024 : भाजप, काँग्रेसला इतक्या जागा मिळणार; योगेंद्र यादवांनी मांडलं सगळं गणित

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर लोकसभा निवडणुकीबद्दल काय म्हणाले?
योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

योगेंद्र यादव यांचा लोकसभा निवडणुकीबद्दल अंदाज

point

भाजपला किती जागा मिळणार?

point

काँग्रेस आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळणार?

Yogendra yadav on Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. पण, त्यापूर्वीच निकालाबद्दलचे अंदाज मांडले जात आहे. निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाजप, काँग्रेसला किती जागा मिळेल? एनडीए आणि इंडिया आघाडीला किती यश मिळेल, याबद्दलचे अंदाज मांडले आहेत. त्यांच्या भाकि‍ताबद्दल राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे. (yogendra yadav prediction lok sabha election 2024)

ADVERTISEMENT

देशात लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान होत असताना निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काही अंदाज मांडले आहेत. यादव यांच्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

भाजपला पुन्हा सत्तेत येणार? यादवांनी काय मांडलं गणित?

भाजप 240 - 260 
एनडीए 35 - 45 
काँग्रेस 85 - 100
इंडिया 120 - 135

हे वाचलं का?

योगेंद्र यादव यांच्या अंदाजानुसार भाजपला २४० ते २६० जागा मिळू शकतात. भाजप बहुमतापासून दूर राहिल. मात्र, एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळेल, असा अंदाज त्यांनी मांडला आहे. या अंदाजानुसार भाजप प्रणित एनडीएचे पुन्हा सरकार येईल.

हेही वाचा >> ठाकरेंचे दोन उमेदवार ठरले! शिवसेनेकडून (UBT) नावे जाहीर 

काँग्रेसच्या जागा वाढणार असा अंदाज यादव यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसला ८५ ते १०० जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना १२० ते १३५ जागा मिळू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसची लोकसभेतील ताकद वाढणार असल्याचे यादव यांच्या अंदाजावरून दिसत असले, तरी सत्तेत येताना दिसत नाही.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपला 272 जागा मिळाल्या नाही तर.. शरद पवारांचं मोठं विधान 

Prashant Kishor : स्वतः समजून घ्या की, कोणाचे सरकार येणार?

योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल मांडलेल्या अंदाजावर प्रशांत किशोर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,

ADVERTISEMENT

"देशात निवडणूक आणि सामाजिक राजकीय विषयांच्या अभ्यासकांपैकी विश्वसनीय असलेला एक चेहरा योगेंद्र यादवजींनी लोकसभा निवडणुकीबद्दलचा त्यांचा अंतिम अंदाज मांडला आहे. 

 

योगेंद्रजींच्या मते या निवडणुकीत भाजपला २४०-२६० आणि एनडीएतील मित्रपक्षांना ३५-४५ जागा मिळू शकतात. म्हणजे भाजप/एनडीएला २७५ ते ३०५ जागा मिळू शकतात.

 

देशात सरकार बनवण्यासाठी २७२ जागा पाहिजेत आणि मावळत्या लोकसभेत भाजपला ३०३ तर एनडीएला ३२३ जागा आहेत. (एनडीएचा घटक असलेल्या शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या, पण आता ते त्यांच्यासोबत नाहीत)

 

आता स्वतःच समजून घ्या की, कुणाचे सरकार येत आहे. बाकी ४ जून रोजी कळेलच की कोण कुणाबद्दल बोलत आहे."

हेही वाचा >> ठाकरेंचा सांगलीत 'गेम'; काँग्रेसचा मेसेज, विशाल पाटलांना ताकद?

रणनीतीकार प्रशांत किशोर यांचाही अंदाज आहे की, भाजप पुन्हा सत्तेत येईल. दोन्ही विश्लेषकांचं म्हणणं आहे की, भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० जागा मिळणे शक्य नाही. असं असलं तरी योगेंद्र यादव यांनी मांडलेल्या अंदाजाची खूप चर्चा होत आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT